Arrest In Samata Bank Scam | दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमधून 17 वर्ष फरारी आरोपीला अटक; समता बँक फसवणूक प्रकरणात सीआयडीची कारवाई
पुणे : Arrest In Samata Bank Scam | नागपूर येथील समता सहकारी बँकेच्या अध्यक्ष व इतरांशी संगनमत करुन फसवणूक करुन तब्बल १७ वर्षे फरार असलेल्या आरोपीला सीआयडीने अटक केली आहे. (Pune CID)
अमन कमरेशभाई हेमानी Aman Kamreshbhai Hemani (वय ५२, रा. नागपूर) असे त्याचे नाव आहे. हा नवी दिल्लीतील वसंतकुंज परिसरातील हॉटेल नयू ग्रँड या पंचतारांकित हॉटेलमध्ये काही दिवसापासून वास्तव्य करीत होता. सीआयडीच्या पथकाने तेथून त्याला अटक केली. (Arrest In Samata Bank Scam)
समता सहकारी बँकचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, कर्जदार व अमन हेमानी तसेच राजश्री हेमानी यांनी १९९७ ते २००७ दरम्यान आपापसात संगनमत करुन बँकेचे खातेदार, गुंतवणुकदार यांचे १४५.६० कोटी रुपयांचा अपहार केला. या प्रकरणात ५७ आरोपींविरुद्ध सिताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अमन हेमानी हा गुन्हा दाखल झाल्यापासून पसार झाला होता. तो वारंवार त्याचे राहण्याचे ठिकाण व संपर्क क्रमांक बदलत होता. पुणे, मुंबई, नागपूर, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली येथे रहात होता. हेमानी हा बँकेचा कर्जदार असताना त्याने समता बँकेकडून कोणत्याही प्रकारचे तारण सिक्युरिटी न देता बिल्स सुटसुविधा प्रात्त करुन कर्जाची परतफेड न करता बँकेतील व्यवस्थापक व इतर यांना हाताशी धरुन बँक खातेदार व गुंतवणुकदार यांची फसवणूक केली आहे. त्याच्याविरुद्ध विशेष न्यायालयाने वॉरंट जारी केले होते.
आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक तयार केले होते.
या पथकास अमन हेमानी हा दिल्लीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला पंचतारांकित हॉटेलमधून अटक केली. पुढील कार्यवाहीसाठी त्याला नागपूर गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात दिले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक वैशाली माने, यांचे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक प्रविण भोसले, हवालदार विकास कोळी, हवालदार सुनिल बनसोडे, हवालदार प्रदीप चव्हाण यांनी केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध