Ashadhi Wari 2024 | पठाण कुटुंबाकडून गेली 48 वर्षे पांडुरंगाची सेवा; जातीय सलोखा व भाईचारा जोपासण्याचे काम

Pathan Family

पुणे : Ashadhi Wari 2024 | असं म्हणतात, “आयुष्यात एकदा तरी वारी करावी” वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. दरवर्षी हजारो वारकरी व विठ्ठल भक्त या वारीत सहभागी होतात. आषाढी वारी हा सण नेहमीच सर्व समुदायांनी एकत्र येऊन साजरा केला जातो. संगम (ता. दौंड) येथील पांडुरंगा चरणी कुरुळी (ता. शिरूर) येथील पठाण कुटुंब (Pathan Family) गेली ४८ वर्षे पांडुरंगाची सेवा करीत आहे. या कुटुंबाची संगम येथील संतराज महाराज देवस्थानवर व पांडुरंगावर अपार श्रद्धा असून सन १९७६ पासून आजतागायत या कुटुंबाने पंढरीच्या पायी वारीची संकल्पना जोपासली आहे. (Ashadhi Wari 2024)

आळंदी येथील शांतीनाथ महाराजांच्या मठामध्ये प्रतिवर्षी पठाण कुटुंबीयांच्या वतीने अन्नदान असते. तसेच, संतराज महाराज संस्थान येथे एखादा वारकरी आजारी पडल्यास त्याला दवाखान्यातील उपचारासाठी आवश्यक त्यावेळी वाहनाची व्यवस्था या कुटुंबाच्या वतीने दिली जाते. विशेष म्हणजे सर्व हिंदू व मुस्लिम सण उत्सव, तसेच गावची यात्रा या कुटुंबामध्ये साजरी केली जाते. गावामध्ये व परिसरामध्ये जातीय सलोखा व भाईचारा जोपासण्याचे काम पठाण कुटुंबीय करीत आहे.

संगम येथील पांडुरंगाचे मंदिर जीर्णोद्धारासाठी या कुटुंबातील दिवंगत मुबारकभाई दाऊदभाई पठाण यांनी सन १९९३ मध्ये १ लाख रुपये वर्गणी दिली होती. त्यांनी सलग २१ वर्षे आषाढी वारीसाठी चोपदार म्हणून काम केले होते. वारीमध्ये पायी चालत हातामध्ये राजदंड घेत वारकऱ्यांना शिस्त लावण्यामध्ये त्यांचा शिरस्ता असायचा.

त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा प्रमोद मुबारकभाई पठाण यांनी पंढरीच्या वारीची परंपरा आजतागायत जोपासली आहे. मुबारकभाई पठाण यांनी आपल्या मुलाने हिंदू धर्माचे सर्व सण, उत्सव साजरे करावेत म्हणून त्याचे नाव प्रमोद ठेवले. प्रमोद पठाण हे संतराज महाराज संस्थांनचे विश्वस्त असून, संस्थांनच्या प्रत्येक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो.

प्रमोद यांच्या कुटुंबाचा आषाढी वारीसाठी वेळापूर येथे असणाऱ्या अन्नदानासाठी कुरुळी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात
येणाऱ्या पंक्तीमध्ये आर्थिक व शारीरिक सहभाग असतो. विश्वस्त असले तरी प्रमोद पठाण वारीमध्ये पडेल ते काम करतात.
यामध्ये स्वयंपाकासाठी भाजीपाला आणणे, वारकऱ्यांना वाढप्याचे काम करणे,
वारकऱ्यांची सेवा करणे अशी कामेही ते करतात.
तसेच, संगम येथील अखंड हरिनाम सप्ताहाची पंगत व महाशिवरात्रीचा फराळ यामध्ये त्यांचे योगदान असते.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Mumbai-Pune Expressway Accident | पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; 5 ठार, 42 जखमी

ACB Trap On Policeman (ASI) | लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | पुणे: खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक

Police Sub Inspector (PSI) Dismissed In Pune | पुणे : 3 लाखांची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक पोलीस सेवेतून बडतर्फ

You may have missed