Ashish Borkar News | चंद्रपूरचे (भद्रावती) ॲड. आशिष बोरकर यांची न्यायाधीश पदी निवड

चंद्रपूर : Ashish Borkar News | महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी परीक्षा 2022, निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत चंद्रपूरचे, भद्रावती येथील ॲड.आशिष जयंद्र बोरकर यांची पहिल्याच प्रयत्नात निवड झाली आहे. राज्यातील हजारो वकील या परीक्षेला समोर गेले होते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत अशी तीन टप्प्यातून ही निवड प्रक्रिया राबवली गेली, ॲड.आशिष बोरकर यांनी कायद्याची पदवी पुण्यातील नामांकित आयएलएस विधी महाविद्यालय पूर्ण केले. तर एलएलएम हे कॉन्स्टिट्यूशनल लॉ मध्ये पूर्ण केले. लॉ चे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यांना वकिली व्यवसायाच्या सहा वर्षाचा अनुभव आहे.प्रॅक्टिस चालू असताना एमपीएससीमार्फत घेतल्या जाणाऱ्या जेएमएफसी या परीक्षेचा अभ्यास चालू केला.कायद्याच्या क्षेत्रात उच्च स्थान गाठण्याचा त्यांचा निर्धार होता. त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन होत आहे.
जिद्दीने परिश्रम करा यश मिळेलच नवनियुक्त न्यायाधीश आशिष बोरकर
आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन, जिद्द, चिकाटीने प्रयत्न केल्यास यशप्राप्ती निश्चित होते, विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा व मेहनतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच आपले ध्येय निश्चित करणे गरजेचे आहे, करिअरसाठी हार्ड वर्क, प्रामाणिकपणा आणि जिद्द या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास कुठलाही क्षेत्रात यशस्वी होणे सहज शक्य आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मेहनतीला कधीच पर्याय नाही,संघर्षाशिवाय विजय नाही. ध्येय, नियोजन, मेहनत, महत्त्वाकांक्षा, त्याग असा यशाचा मूलमंत्र्या जपा.