Ashok Chavan | ‘भाजपात प्रवेश करायला गडबड झाली?’; अशोक चव्हाण म्हणाले – “राजकारणात अनेक चढ-उतार…”

Ashok Chavan

छ. संभाजीनगर : Ashok Chavan | लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला (Congress) रामराम करत भाजपात (BJP) प्रवेश केला. त्यानंतर पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) अच्छे दिन आले. आगामी विधानसभा निवडणुकीतही (Maharashtra Assembly Election 2024) असेच चित्र दिसेल अशी चर्चा आहे. दरम्यान याबाबत माध्यमांनी भाजप नेते अशोक चव्हाण यांना प्रश्न विचारला असता त्याबाबत त्यांनी भाष्य केले आहे.

भाजपमध्ये जाण्याचा निर्णयात गडबड झाली असे वाटते का?, असा प्रश्न अशोक चव्हाण यांना विचारण्यात आला होता. त्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वात विकसित भारताची भूमिका आहे. त्यासाठी हा निर्णय घेतला. राजकारणात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. हे माझ्यासाठी नवीन नाही, अनेकवेळा फायदा नुकसान झालं.

पण फायदा- नुकसानाचा विचार करण्याची माझी स्टेज निघून गेली आहे. कधी हरलो म्हणून घरी बसलो नाही, आणि जिंकलो म्हणून हळूहळू गेलो नाही. जो रस्त्या स्वीकारलाय, त्या रस्त्याने प्रामाणिकपणे जायचं काम करतोय, असे म्हणत अशोक चव्हाण यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. (Ashok Chavan)

लोकसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या खासदार अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचा भाजपला म्हणावा तसा फायदा झाला नाही. कारण, अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतरही लोकसभा निवडणुकीत भाजपला मराठवाड्यात मोठा फटका बसला. तर, नांदेड आणि लातूर येथील दोन्ही मतदारसंघात भाजपचा पराभव झाला आहे.

तसेच, अशोक चव्हाण यांच्यासमवेत काही आमदारही भाजपात येणार असल्याची चर्चा होती, पण अद्यापही एकही आमदार भाजपात आला नसून लोकसभा निवडणुकांनंतर वातावरण आणखी बदललं आहे. त्यामुळे, भाजपामध्ये जाण्यासाठी घाई गडबड केली असं तुम्हाला वाटतं का, यावर चव्हाण यांनी विस्ताराने भूमिका मांडली आहे.

मराठवाड्यात भाजपा हरली यावर बोलताना ते म्हणाले, बूथ कमिटी पेक्षा लोकांना काय हवं आहे,
असं केलं तर लोकांना अपील होईल. यापुढे भाजपाला जनमताचा कौल लक्षात ठेवून काम करणे गरजेचे आहे,
असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले, आता परिस्थिती बदलत जाते, एखाद्या विषयाची तीव्रता नेहमीच राहते असे नाही.
महाराष्ट्रातील जनता एकदा सजा दिल्यानंतर दुसऱ्यांदा त्याच कारणास्तव सजा देईल असे वाटत नाही.
आरक्षण मिळाले की लगेच नोकरी मिळेल असे नाही, त्यासाठी अभ्यास करावा लागेल.
जरांगे यांना मी जाहीरपणे भेटतो, भेट जाहीर होते लपून-छपून करत नाही.

मी त्यांचे कौतुक करतो, मला त्यांचा अभिमान आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी त्यांचं मोठं योगदान आणि पाठपुरावा आहे.
त्यामुळे, लोकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आदर आहे, असेही चव्हाण यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना म्हटले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेसकडे पुण्यातील 8 मतदारसंघातून 24 इच्छुकांचे अर्ज; काँग्रेसची महत्वकांक्षा वाढली

ACP Satish Govekar | सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पोलीस पदक जाहीर

Maharashtra DCP / SP Transfers | शिरीष सरदेशपांडे यांची पुणे एसीबीच्या अधीक्षकपदी नियुक्ती; राज्यातील 30 पोलीस उपायुक्त, अधीक्षकांच्या बदल्या

You may have missed