Ashok Chavan | अशोक चव्हाणांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – “विधानसभा निवडणुकीचा प्रचार मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्त्वात मात्र मुख्यमंत्रिपद …”

Ashok Chavan

मुंबई: Ashok Chavan | आगामी विधानसभा निवडणुकीला (Maharashtra Assembly Election 2024) घेऊन सर्वच पक्षांनी तयारी सुरू केलेली आहे. लोकसभेप्रमाणेच आता विधानसभेलाही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीने या निवडणुकीला सामोरे जाताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिलेला नाही. (Ashok Chavan)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मविआचा (Mahavikas Aghadi) मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील का? यावरून महाविकास आघाडीत मतमतांतरे आहेत. मात्र महायुतीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच आगामी निवडणुकीला सामोरे जाताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील अशी चर्चा आहे. याबाबत भाजप नेते अशोक चव्हाण यांनी माध्यमांना बोलताना भाष्य केले आहे.

विधानसभा निवडणुकीचा प्रचार मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्त्वात केला जाईल. मात्र मुख्यमंत्रिपदाचा निर्णय निवडणुकीनंतर जाहीर होईल, अशी स्पष्टोक्ती भाजप खासदार अशोक चव्हाणांनी दिली. तसेच त्यांनी मराठा आरक्षण, बदलापूर अत्याचार प्रकरण, याबाबतही प्रतिक्रिया दिली आहे.

अशोक चव्हाण म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार महायुती सरकार एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण असणार? हे महायुतीतील सर्व पक्ष एकत्रित ठरवतील. विधानसभेला कोणाला किती जागा मिळाल्या हे पूर्णपणे तेथील परिस्थितीवर अवलंबून आहे. जिथे ज्या पक्षाची जिंकण्याची शक्यता जास्त आहे त्या पक्षाला ती जागा दिली पाहिजे.

बदलापूर प्रकरणावर बोलताना ते म्हणाले, बदलापूरची घटना अतिशय गंभीर आहे.
या घटनेनंतर चिंतेचे वातावरण आहे. अशा घटनांचा पीडितेच्या आयुष्यावर तसेच तिच्या कुटुंबावर
देखील परिणाम होतो. हा राजकीय मुद्दा नाही मात्र काही लोक गदारोळ
माजवून त्यावर राजकारण करत आहेत, त्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, असेही चव्हाण म्हणाले.

मराठा आरक्षणावर बोलताना चव्हाण म्हणाले, मराठा आरक्षणाचा मुद्दा निवडणुकांशी जोडणार नाही.
कारण हा अनेक वर्षापासून सुरू असलेला मुद्दा आहे.
एकनाथ शिंदे सरकारच्या काळात मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेला वेग आला आहे. १० % आरक्षणाचा फायदा जनतेला झाला आहे. ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत त्यांना ओबीसी सर्टिफिकेट मिळाले आहे, त्यामुळे बऱ्याच अंशी दिलासा मिळाला आहे.

अजून काही प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात येते. मात्र या सर्वपक्षीय बैठकीला ना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते उपस्थित राहत नाहीत. मराठा आरक्षण हा राजकीय नाही तर सामाजिक प्रश्न आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | मुलीच्या औषधाला नाही, दारुला पैसे आहेत, म्हटल्याने पत्नीचे डोके भिंतीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न

Maharashtra Assembly Election 2024 | मुंबईतील 7 जागा लढवण्याची शरद पवार गटाची तयारी; इच्छुक उमेदवारांची नावेही आली समोर; जाणून घ्या

BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय

Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – “मित्रपक्षांनाही जो चेहरा नकोसा झालाय, त्याला …”

You may have missed