Ashok Chavan On Sharad Pawar | “शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे आम्हाला काय करायचंय”, अशोक चव्हाणांचा टोला

Ashok Chavan-Sharad Pawar

नांदेड : Ashok Chavan On Sharad Pawar | महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा प्रवास कार्यक्रमांतर्गत अशोक चव्हाण यांनी आज (दि.८) दुपारी परतूर विधानसभा मतदारसंघाचा (Partur Assembly Constituency) दौरा केला. माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांच्या परतूर मतदारसंघातील अठरापगड जातींच्या शेकडो कार्यकर्त्यांनी याप्रसंगी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. एकिकडे मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनामुळे (Maratha Reservation Andolan) फटका बसल्यानंतर अशोक चव्हाण मराठवाड्यात सक्रिय झाले आहेत.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज शरद पवारांच्या डोक्यातले कळायला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना शंभर जन्म घ्यावे लागतील, अशी टीका केली होती. याला प्रत्युत्तर देत त्यांच्या डोक्यात काय चाललंय याचं आम्हाला काय करायचं? असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान पुढच्या महिन्यात निवडणूक जाहीर होऊन नोव्हेंबरमध्ये निवडणुका लागतील, असा अंदाजही चव्हाण यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, “आरक्षणाचा विषय दिसतो तसा सोपा नाही. कोणाचं आरक्षण काढून घेणे एवढे सोपं नाही. मनोज जरागेंचे अनेक गैरसमज दूर केले आहेत. पुढच्या महिन्यात निवडणूक घोषित होईल आणि नोव्हेंबर मध्ये मतदान होईल असा अंदाज आहे.

माझी आणि बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) साहेबांची चर्चा झाली.
त्यांनी मला सांगितले की, मराठवाड्यातील काही मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांशी बोलले पाहिजे.
कार्यकर्त्यांनी काय मानसिकता आहे. त्या भागातील लोकांचे काय मत आहे. हे मी जाणतो समजतो.
मला परतूर मतदारसंघामध्ये जाण्यास आवडेल, असे मी बावनकुळ यांना आवर्जुन सांगितले. ” (Ashok Chavan On Sharad Pawar)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed