Atal Pension Yojana | ज्येष्ठांना 5000 नव्हे 10000 रुपये पेन्शन देणार सरकार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पात करतील घोषणा?

नवी दिल्ली : Atal Pension Yojana | अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) २३ जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून संपूर्ण देशाच्या अनेक अपेक्षा आहेत. दरम्यान, सूत्रांकडून दावा केला जात आहे की, सरकार अर्थसंकल्पात आपली प्रमुख सामाजिक सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना अंतर्गत किमान हमी रक्कम दुप्पट करून १०००० रुपये करू शकते. हे वृत्त एका हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.
सरकार सामाजिक सुरक्षेवर लेबर अॅक्ट लागू करण्यावर प्राथमिक तयारी करत आहे. ईटीच्या वृत्तानुसार सरकार अटल पेन्शन योजनेत मिनिमम पेआऊट वाढवून १०००० रुपये करू शकते. एका अधिकाऱ्याने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर ईटीला सांगितले की, अटल पेन्शन योजना आणखी चांगली करण्यासाठी काही सूचना देण्यात आल्या आहेत, यावर विचार होत आहे. मात्र, अटल पेन्शन योजनेत तुम्ही किती योगदान करता त्यावर पेन्शन अवलंबून असते.
काय आहे अटल पेन्शन योजना
अटल पेन्शन योजना २०१५-१६ मध्ये पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून सुरू करण्यात आली होती. ही योजना नॅशनल पेन्शन सिस्टमला जोडण्यात आली आहे. या योजनेतून मृत्यु अथवा कोणत्याही गंभीर आजाराच्या स्थितीत ६० वर्षे वयात जमा होणारे पैसे १०० टक्के काढू शकता. जर पैसे काढले तरी सुद्धा तरी जमा केलेल्या पूर्ण रक्कमेवर पेन्शन मिळेल. इन्कम टॅक्स भरणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Hit & Run Case | पुणे हिट अँड रन: ऑनड्युटी असलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना उडवलं,
एकाचा मृत्यू तर एक गंभीर
Rain In Lonavala Khandala | लोणावळा, खंडाळ्यात संततधार; पाऊस, धुके अन् पर्यटकांची गर्दी
Sharad Pawar On Devendra Fadnavis | “फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला पण आता…”
शरद पवारांचे मोठे विधान