Atal Setu Bridge Suicide | पुण्याच्या बँकरची अटल सेतूवरून समुद्रात उडी मारून आत्महत्या; कामाच्या दबावाला कंटाळून टोकाचा निर्णय
मुंबई : Atal Setu Bridge Suicide | पुण्याच्या बँकरने नवी मुंबईच्या अटल सेतूवरून समुद्रात उडी मारून आत्महत्या (Suicide Case) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने अटल सेतूवरून उडी मारल्याचे समजताच पोलीस तिथे पोहोचले. परंतू, तोवर बँकर ॲलेक्स रेगी याचा मृत्यू झाला होता. सीसीटीव्हीमध्ये कार थांबल्याचे पाहून यंत्रणेने पोलिसांना याची सूचना दिली होती. परंतू, पोलीस पोहोचेपर्यंत ॲलेक्सने समुद्रात उडी मारली होती. (Young Pune Banker Suicide)
मिळालेल्या माहितीनुसार, ॲलेक्स हा पिंपरीत राहणारा असून कंपनीच्या मिटींसाठी तो मुंबईला गेला होता. मुंबईत राहणाऱ्या सासऱ्याचीही त्याने भेट घेतली होती. तेथून पुण्याला परतत असताना त्याने अटल सेतूवरून उडी मारली आणि आयुष्य संपविले. अवघ्या ३५ वर्षीय बँकरने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
कामाच्या ताणातून त्याने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. त्याने सुसाईड नोट मागे सोडलेली नाही. बचाव पथकाने त्याचा मृतदेह शोधला आणि कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. रेगी हा कोटक महिंद्रा बँकेत नोकरीला होता. तो बीकेसीला बँकेच्या बैठकीला गेला होता. वरिष्ठांनी त्याच्यावर कामाचा दबाव टाकल्याने त्याने आत्महत्या केली, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. (Atal Setu Bridge Suicide)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा