Attack On Car Of Jitendra Awhad | संभाजीराजेंवर केलेल्या टिकेवरून जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला; आव्हाड म्हणाले – ‘आतापर्यंत तुम्हाला आदरार्थी बोलत होतो, पण…’

Attack On Car Of Jitendra Awhad

मुंबई: Attack On Car Of Jitendra Awhad | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Sharad Pawar NCP) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनांवर स्वराज्य संघटनेच्या (Swaraj Sanghatana) पदाधिकाऱ्यांनी हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे. आज ठाणे (Thane) येथील घरी परतत असताना पोलीसांच्या समोरच तीन कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला. (Attack On Car Of Jitendra Awhad)

https://www.instagram.com/p/C-IC3BFJ7EW

काही दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या विशाळगडावर झालेल्या दंगलीनंतर (Vishalgad Violence) जितेंद्र आव्हाड यांनी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांच्यावर टीका केली होती. संभाजीराजेंच्या शरीरात छत्रपती शाहू महाराजांचे रक्त वाहत आहे का? हे तपासावे लागेल, असे विधान आव्हाड यांनी केले होते. या विधानाचा राग डोक्यात धरून स्वराज्य संघटनेकडून आज आव्हाड यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला.

माध्यमांशी बोलताना आव्हाड म्हणाले, ” तीन जणांनी आज माझ्या गाडीवर हल्ला केला. माझ्याकडे चार पोलीस होते, पण मी त्या तरुणांवर कोणताही हल्ला करण्यास सांगितले नाही. मी या भ्याड हल्ल्यांना घाबरणार नाही. मी विशाळगड बाबत बोललो कारण छत्रपती शाहू महाराजांनी समतेचा जो वारसा दिला आहे, तो त्यांनी पुढे न्यायला पाहीजे होता.

पण त्यांनी केवळ बोलघेवडेपणा केला. माझ्या गाडीवर हल्ला करून मी शांत बसेन असे तुम्हाला वाटत असेल पण तसे होणार नाही मी आणखी त्वेषाने तुमच्याविरोधात बोलणार आहे. आतापर्यंत तुम्हाला आदरार्थी बोलत होतो, पण आता मी बोलण्यासाठी मोकळा आहे “, असे आव्हाड यांनी सांगितले.

विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र या आंदोलनाच्या निमित्ताने विशाळगडावर काही समाजकंटकांनी तोडफोड केली.

यानंतर संभाजी राजेंवर टीका करत असताना जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की,
संभाजीराजेंना आता छत्रपती म्हणणे सोडून द्या. कारण त्यांना वंशपरंपरागत जो अधिकार मिळालेला होता,
तो पुढे घेऊन जाण्याची त्यांची जबाबदारी होती. शाहू महाराज आणि संभाजी राजे यांच्या रक्तात काय आहे?
हे तपासण्याची गरज आहे.

शाहू महाराजांच्या घराण्यातला माणूस असे विधान करतो की, ज्यामुळे दंगल उसळते,
तो शाहू महाराजांच्या घरातील असूच शकत नाही. त्यामुळे त्यांना छत्रपती कुणी म्हणावे,
याचा विचार झाला पाहीजे. ज्यांच्याकडे कर्तुत्व आहे, त्यांना छत्रपती म्हणावे.

आताचे शाहू महाराज यांना मी नक्कीच छत्रपती म्हणेण.
कारण त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून लोकांची माफी मागितली.
जे राजे घराण्यातील लोकांनी करायला पाहीजे, ते शाहू महाराजांनी केले होते, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Hadapsar Pune Crime News | प्रेमात अडथळा ठरणार्‍या 13 वर्षाच्या मुलाच्या गळ्यावर वार करुन
केला खूनाचा प्रयत्न; फलटणहून मजनूला अटक, हडपसरमधील घटना

How To Get Compensation | पाऊस आणि पुरामुळे घराचे झाले नुकसान, कशी मिळणार नुकसान भरपाई,
कोणत्या सरकारी विभागाकडे मागावी मदत, जाणून घ्या सविस्तर

Delhi-Mumbai Expressway | दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वे कधी सुरू होणार, किती काम पूर्ण आणि बाकी?
नितीन गडकरी यांनी संसदेत दिली सविस्तर माहिती

RBI Guidelines | केवळ OTP ने चालणार नाही काम, याच्याही पुढील विचार करा,
डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी RBI ची बँकांना महत्वाची सूचना

Infosys GST Evasion Issue | इन्फोसिसला आलेल्या जीएसटी नोटीसमुळे भडकले मोदी समर्थक उद्योगपती, म्हणाले – ‘हा टॅक्स टेररिझम…’

Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले – ‘कुणाला संपवायचं असेल तर मनगटात दम लागतोय, घरात बसून…’

You may have missed