Attack On Female Doctor | धक्कादायक: मद्यधुंद रुग्णाची महिला डॉक्टरला मारहाण; मुंबईतील सायन रुग्णालयातील प्रकार

Female Doctor

मुंबई : Attack On Female Doctor | महापालिकेतर्फे चालवण्यात येणाऱ्या रुग्णालयात एका महिला डॉक्टरला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना लोकमान्य टिळक रुग्णालयात (Lokmanaya Tilak Hospital) म्हणजेच सायन रुग्णालय (Sion Hospital) या नावाने परिचित असलेल्या ठिकाणी घडली आहे. रुग्णालयात मद्यधुंद अवस्थेत राडा करत एका रुग्णाने महिला डॉक्टरला मारहाण केली. रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली अशी माहिती मार्डच्या डॉक्टरांनी दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला आहे. राज्य आरोग्य सेवा हिंसाचार प्रतिबंध कायद्याच्या अंतर्गत हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका रुग्णाने मद्यधुंद अवस्थेत राडा घातला आणि एका महिला डॉक्टरला मारहाण केली. एक माणूस जखमी अवस्थेत लोकमान्य टिळक रुग्णालयात आला. त्याला गंभीर इजा झाली होती आणि त्याच्या जखमेला टाके घालावे लागणार होते. इतर डॉक्टरांनी त्याला आधीच टाके घातले होते आणि त्याच्या जखमेत अडकलेला कापूस डॉक्टर काढत होत्या, हे करावं लागतं कारण काय झालं आहे ते पाहण्यासाठी जखम मोकळी करावी लागते. त्यावेळी या रुग्णाला वेदना होऊ लागल्या ज्यानंतर त्याने डॉक्टरला ढकललं. या रुग्णाने मद्यपान केलं होतं अशी माहितीही समोर आली आहे. आम्ही याबाबत अधिक माहिती घेत आहोत असे पोलिसांनी स्पष्ट केले.

मार्डचे सदस्य असलेले डॉक्टर अक्षय मोरे यांनी यासंदर्भांतील पोस्ट लिहिली आहे. त्यांनी म्हंटले आहे की, रुग्ण हा त्याच्या सात ते आठ साथीदारांसह आला होता. त्याने मद्यपान केलं होतं. तो कुणालातरी मारहाण करुन आला होता. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर जखमा होत्या. पहाटे साडेतीनच्या दरम्यान महिला डॉक्टर तपास होती. त्यासाठी आधीपासून जखमेची पट्टी काढावी लागणार होती. ही नॉर्मल प्रोसिजर आहे. नेमकं काय घडलं आहे हे पाहण्यासाठी जखमेची पट्टी काढावी लागते.

यानंतर या रुग्णाने तिला शिव्या देण्यास सुरुवात केली.
रुग्ण ओरडू लागल्याने इतर नातेवाईकांनी तिला शिव्या द्यायया सुरुवात केली.
तिच्या दिशेने रक्ताने माखलेले बोळे फेकले.
त्यावेळी महिला डॉक्टरांनी सुरक्षा रक्षकाला बोलवलं म्हणून तिला गंभीर स्वरुपातली मारहाण झाली नाही, असं अक्षय मोरे यांनी सांगितलं आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Anjali Damania On Ajit Pawar | राज्याच्या राजकारणात आज मोठा गौप्यस्फोट! अंजली दमानिया म्हणाल्या – अजित पवारांकडे इतका पैसा येतो कुठून?

Maharashtra Assembly Election 2024 | आज विधानसभा निवडणूक झाल्यास कोण जिंकणार, महायुती की मविआ? ओपिनियन पोलची धक्कादायक आकडेवारी समोर

Prithviraj Chavan On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या मागणीवर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘ती आमची प्राथमिकताच नाही!’

Kondhwa Pune Crime News | सहदेव महंत रामगिरी महाराजांविरोधात कोंढव्यात गुन्हा दाखल; दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

You may have missed