Atulchandra Kulkarni | ‘हे एक नवे आव्हान आहे’ – अतुलचंद्र कुलकर्णी

Atulchandra Kulkarni

निवृत्त आयपीएसअधिकारी अतुलचंद्र कुलकणी यांची मॅट सदस्यपदी निवड

पुणे : Atulchandra Kulkarni | पोलीस सेवेत असताना इतकी वर्षे वेगवेगळ्या आव्हानांशी यशस्वीपणे सामना केला. आता, निवृत्तीनंतर आता एक नवे आव्हान मिळाले आहे. प्रशासकीय कामकाजात एक जज्ज म्हणून काम करायचे आहे. हे वेगळे जग आहे, असे मत निवृत्त आयपीएस अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी यांनी ‘पोलीसनामा’ शी बोलताना व्यक्त केले. (Maharashtra Administrative Tribunal-MAT Court)

निवृत्त आयपीएस अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी यांची केंद्र सरकारने महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाच्या (मॅट) मुंबई बँचच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे. त्याबद्दल ते बोलत होते.

अतुलचंद्र कुलकर्णी हे राष्ट्रीय तपास संस्थेतून जानेवारीमध्ये निवृत्त झाले होते. अतुलचंद्र कुलकर्णी हे मुळचे माढा येथील राहणारे असून ते १९९० मध्ये भारतीय पोलीस सेवेत भरती झाले. त्यांनी नांदेड, जालना, जळगाव, बुलढाणा, मुंबई, भंडारा, नागपूर येथे विविध पदावर काम केले होते. केंद्रीय गुप्तचर विभागात (आयबी) ११ वर्षे सेवा दिली आहे.

त्यांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), कारागृह अतिरिक्त पोलीस महासंचालक, दहशतवाद विरोधी पथक येथे काम पाहिले आहे. एटीएसमध्ये असताना त्यांच्या नेतृत्वाखाली १२८ तरुणाचे मनपरिवर्तन करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणले होते.आता मॅटमध्ये काम करताना ते शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना न्याय देण्याचे काम करणार आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sahakar Nagar Pune Crime News | पुणे : अनैसर्गिक कृत्य करायला लावून धमकाविल्याने दहावीतील मुलाची आत्महत्या

Eknath Shinde To Shivsainik | मुख्यमंत्रीपदावरून साशंकता, एकनाथ शिंदेंचे शिवसैनिकांना भावनिक
आवाहन; म्हणाले – ‘माझ्यावरील प्रेमापोटी…’

Ulhas Dhole Patil | माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांचे निधन

Pune Rural Police News | स्मशानभूमीमधील लाकडावरुन पोलिसांनी उघडकीस आणला खुनाचा गुन्हा ! वालचदंनगर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

Sahakar Nagar Pune Accident News | पीएमपी बसच्या धडकेत रस्ता ओलांडणार्‍या महिलेचा मृत्यु; पुणे सातारा रोडवरील सहकारनगर येथील घटना

Kondhwa Pune Crime News | कोंढवा: नराधम पित्याने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार

Katraj Pune Crime News | कोर्टाने तडीपार केले असतानाही दरोड्याच्या तयारीत असलेली चुहा गँग जेरबंद ! पिस्टल, काडतुस, मॅफेड्रान, रोकड असा माल हस्तगत

You may have missed