Avinash Dharmadhikari’s Lecture | ‘चाणक्य ते मोदी व्हाया विवेकानंद’; अविनाश धर्माधिकारींच्या व्याख्यानाची तयारी जोरात
पुणे : Avinash Dharmadhikari’s Lecture | रा.स्व. संघाच्या अरण्येश्वर प्रभात शाखेच्या पुढाकाराने सहकारनगरमध्ये आयोजित केलेल्या ‘शिक्षण महर्षी लक्ष्मीकांत जांभोरकर स्मृती व्याख्यानमालेत’ माजी सनदी अधिकारी आणि विचारवंत अविनाश धर्माधिकारी यांच्या रविवारी दि. ७ डिसेंबर रोजी होणा-या व्याख्यानाबाबत तरुणांमध्ये कमालीची उत्सुकता असल्याचे जाणवते. व्याख्यानमालेच्या कार्यकर्त्यांनी तरुणांवर लक्ष केंद्रित केले असून महाविद्यालये,वसतिगृहे, अभ्यासिका अशा अनेक ठिकाणी निमंत्रण पोहोचवले आहे. चाणक्य ते मोदी व्हाया विवेकानंद हा व्याख्यानाचा विषय असून त्याबाबत तरुणांमध्ये विशेष कुतुहल आहे.
व्याख्यानमालेच्या कार्यकर्त्यांची एक बैठक रविवारी प्रत्यक्ष व्याख्यान स्थळावर झाली.यावेळी सर्व व्यवस्थांचा आढावा घेण्यात आला.
हे व्याख्यान येत्या रविवारी दि. ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता सहकारनगर क्र.१ मधील ‘विद्याविकास विद्यालया’च्या क्रीडा संकुलाच्या मैदानावर होईल. व्याख्यान सर्वांसाठी खुले राहील.
