Ayushman Bharat योजनेत मोठ्या बदलांची तयारी… 5 नव्हे आता 10 लाख होऊ शकते विमा कव्हर!
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात केंद्रातील एनडीए सरकार याच महिन्यात अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर करणार आहे. यामध्ये अशी शक्यता वर्तवली जात आहे की, सरकार या अर्थसंकल्पात पंतप्रधान जन आरोग्य योजना (PMJAY) आणि आयुष्मान भारत योजनेबाबत (Ayushman Bharat Scheme) मोठ्या घोषणा करू शकते. रिपोर्टनुसार, केंद्र आयुष्मान भारत योजनेंतर्गत कव्हरेज मर्यादा ५ लाखावरून वाढवण्यावर विचार करत आहे.
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, एनडीए सरकार आयुष्मान भारत-पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या आणि विमा रक्कम दोन्ही वाढवण्यावर विचार करत आहे. यामध्ये सूत्रांच्या संदर्भाने म्हटले आहे की, योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारी संरक्षण मर्यादा ५ लाख रुपयावरून वाढवून १० लाख रुपये प्रती वर्ष करण्याची तयारी आहे.
रिपोर्टनुसार, एनडीए सरकार पुढील तीन वर्षात प्रमुख आयुष्यमान भारत आरोग्य विमा योजनेंतर्गत लाभार्थी आधार दुप्पट करण्यावर विचार करत आहे.
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मागील २७ जून रोजी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना म्हटले होते की, ७० वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व ज्येष्ठांना सुद्धा आयुष्यमान योजनेत कव्हर केले जाईल आणि त्यांना मोफत उपचाराची सुविधा मिळेल.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Hit & Run Case | पुणे हिट अँड रन: ऑनड्युटी असलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना उडवलं,
एकाचा मृत्यू तर एक गंभीर
Rain In Lonavala Khandala | लोणावळा, खंडाळ्यात संततधार; पाऊस, धुके अन् पर्यटकांची गर्दी
Sharad Pawar On Devendra Fadnavis | “फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला पण आता…”
शरद पवारांचे मोठे विधान