Azam Campus Pune | आझम कॅम्पस येथे स्वातंत्र्यदिनी ‘युनिटी इन डायव्हर्सिटी ‘ सांस्कृतिक कार्यक्रम; उलगडणार भारतातील सांस्कृतिक वैविध्य !

Azam Campus Pune

पुणे : Azam Campus Pune | महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस,पुणे कॅम्प) येथे स्वातंत्र्य दिनी, १५ ऑगस्ट रोजी संस्थेचे अध्यक्ष तसेच ‘डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हार्सिटी’चे कुलपती डॉ.पी.ए.इनामदार यांच्या हस्ते फंक्शन ग्राउंड येथे सकाळी ८. ३० वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे .त्यानंतर ‘युनिटी इन डायव्हर्सिटी’ संकल्पनेवर आधारित विशेष सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थी,विद्यार्थिनी सादर करणार आहेत. (Azam Campus Pune)

भारतातील समृद्ध सांस्कृतिक वैविध्य या सांस्कृतिक कार्यक्रमातुन उलगडून दाखविण्यात येणार आहे. त्यात ६ विद्यालयांचे १४२ विद्यार्थी सहभागी होणार आहेत.कार्यक्रमाच्या शेवटी ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ गीतावरील सादरीकरणात उपस्थित सर्व सहभागी होणार आहेत.आझम कॅम्पस परिवारातील शैक्षणिक संस्था असेम्ब्ली हॉल येथे हा सांस्कृतिक कार्यक्रम सकाळी नऊ वाजता सादर करणार आहेत.संस्थेचे सचिव प्रा.इरफान शेख यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sinhagad Road Flyover | अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले – ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले असे आमचे सरकार’

Hadapsar Pune News | हडपसर: बहुचर्चित भारतातील सर्वात पहिल्या प्रभू श्रीरामांच्या पूर्णाकृती शिल्पाचे मुख्यमंत्र्याचा हस्ते होणार उद्घाटन !

Pune ACB Trap Case | महिला सहायक सरकारी वकिल एसीबीच्या जाळ्यात; जप्त कार परत मिळवून देण्यासाठी मागितली लाच

Sri Sri Ravi Shankar | वैचारिक अभिव्यक्ती आणि विविधता हेच भारताला भारत बनवते ! – गुरुदेव श्री श्री रविशंकर

You may have missed