Bacchu Kadu On Amit Shah Statement | ‘शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार मग अजितदादा कोण?’; बच्चू कडूंचा अमित शहांना सवाल

Bacchu kadu-Amit shah

मुंबई : Bacchu Kadu On Amit Shah Statement | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यात झालेल्या भाजपच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवारांवर (Sharad Pawar) कडाडून टीका केली. ” भारतातील राजकारणात भ्रष्टाचाराचे म्होरके कोण असेल तर शरद पवार आहेत. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम हे शरद पवार यांनी केलं आहे अशी घणाघाती टीका अमित शहा यांनी पुण्यात भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केली (BJP State Executive Body’s convention in Balewadi Pune). दरम्यान शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बच्चू कडू म्हणाले, “शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार आहेत तर मग अजितदादा (Ajit Pawar) कोण आहेत? अमित शहा यांच्या तोंडातून चुकीने निघाले असतील ते विसरभोळे आहेत. बऱ्याचदा अमित शहा चुकीचे बोलतात मग नंतर अंगलट येते, असा खोचक टोला देखील बच्चू कडूंनी शहा यांना लगावला. तसेच पुढे बोलताना, शरद पवार भाजप सोबत जाणार नाहीत. अजित पवार यांनी आता परत शरद पवार यांच्या सोबत जाऊ नये असेही बच्चू कडू म्हणाले.

अमित शहांच्या टीकेवर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ” आज भाजपचे लोक ज्याला एनडीए सरकार म्हणतात, ते काही महिन्यांपूर्वी मोदी सरकार होतं. याच मोदी सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. त्यामुळे शरद पवार नक्की काय आहेत हे भाजपनं ठरवावं. अमित शहा हे त्याच सरकारमध्ये मंत्री होते. मात्र, हे सर्व ते विसरले असतील, त्यामुळे त्यांनी टीका केली,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, ” भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले,
ते नेते आज महायुती सरकारमध्ये मंत्री आहेत.
अमित शहांच्या कार्यक्रमात ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त भ्रष्टाचाराचे आरोप होते
ते अशोक चव्हाण यांच्या मागे बसले होते, महाराष्ट्रच नाही,
तर त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ज्या नेत्यांवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले
त्यापैकी ९० टक्के लोक आज भाजपमध्ये आहेत ते वॉशिंग मशीनमुळे,” असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

PMC Solid Waste Management Dept | पुणे: कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी मर्जीतील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर घुसवण्यासाठी घनकचरा विभागाचा ‘वरिष्ठां’वर दबाव

Pune Crime News | पुणे : व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आयटी तरुणाची आत्महत्या

Supriya Sule On Amit Shah | “शरद पवार भ्रष्टाचाराचे म्होरके”, अमित शहांच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर

Shivsena UBT On Amit Shah | ‘आम्ही तुमच्यासारखे जिना फॅन्स क्लबचे सदस्य नाही’; अमित शहांच्या टीकेवर ठाकरे गटाचे प्रत्युत्तर

You may have missed