Bachchu Kadu On IAS Puja Khedkar | “पूजा खेडकर यांना जन्मठेपेची शिक्षा व्हायला हवी”, बच्चू कडू यांची मागणी
पुणे : Bachchu Kadu On IAS Puja Khedkar | वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर चर्चेत आहेत. त्यांच्याबाबत आता दैनंदिन नवनवे खुलासे समोर येत आहेत. पूजा खेडकर यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची अपडेट नुकतीच समोर आलेली आहे. त्यांचे प्रशिक्षण थांबवण्यात आले आहे.
राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांना लालबहादुरशास्त्री राष्ट्रीय अकादमी, मसुरीतून सूचना करण्यात आली आहे. दरम्यान पूजा खेडकर यांनी यूपीएससी कडे दिव्यांग असल्याची खोटी बतावणी केल्याची चर्चा आहे. यावरून आमदार बच्चू कडू यांनी खेडकर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
बच्चू कडू म्हणाले, ” पूजा खेडकर यांना जन्मठेपेची शिक्षा व्हायला पाहिजे. हायकोर्टाचे निकाल बदलायला लागले आहेत. आता काय राहिले? यूपीएससी सारखी संस्था जर अशी वागत असेल तर त्या संस्थेवर सुद्धा दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. पूजा खेडकरला पदावरुन बाहेर काढून तिला जन्मठेपेपर्यंत पोहोचवले पाहिजे. पुन्हा असा गुन्हा कोणी करणार नाही, अशाप्रकारची व्यवस्था केली पाहिजे “, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. (Bachchu Kadu On IAS Puja Khedkar)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
ACB Trap On Policeman (ASI) | लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
Pune Crime News | पुणे: खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक