Bachchu Kadu On Mahayuti Govt | “… तर आम्ही निर्णय घेणार”; बच्चू कडूंचा सरकारला इशारा
मुंबई : Bachchu Kadu On Mahayuti Govt | लोकसभा निवडणूकीनंतर (Lok Sabha Election 2024) राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024) रणसंग्राम रंगणार आहे. येत्या काही महिन्यांमध्येच राज्याची विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र त्यापूर्वीच राजकारण रंगले आहे. महायुतीसह महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) मोर्चेबांधणी व जागावाटपाची चर्चा सुरु झाली आहे. जागांवर दावा देखील केला जात असून निवडून येणाऱ्या जागांबाबत देखील अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, प्रहार संघटनेचे (Prahar Sanghatna) नेते बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये (Mahayuti) मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. यातच तिसऱ्या आघाडीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. असे असतानाच प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. “आमच्या मागण्यांवर राज्य सरकारने निर्णय घेतला नाही तर आम्ही निर्णय घेणार आहोत”, असा सूचक इशारा बच्चू कडू यांनी दिला.
माध्यमांशी बोलताना आमदार बच्चू कडू यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य केले. ते म्हणाले “राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या आणि त्या मागण्यांचा शासन निर्णय काढला तर तर मी स्वत: विधानसभेची निवडणूक लढणार नाही. माझी जागा मी भाजप किंवा शिवसेनेला देईल. पण जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मग तेच मुद्दे घेऊन लढल्याशिवाय राहणार नाही. तसेच तिसरी किंवा दुसरी आघाडी आम्ही मानत नाही. आमची शेतकरी आणि शेतमजूरांची आघाडी राहिल”, असं मोठं विधान बच्चू कडू यांनी केले आहे. (Bachchu Kadu On Mahayuti Govt)
ते पुढे म्हणाले, “आज जी पत्रकार परिषद घेत आहे.
याचं कारण की ९ ऑगस्ट रोजी आम्ही शेतकरी, दिव्यांग आणि वंचित घटकांसाठी एका मोठ्या मोर्चाचे आयोजन केलं आहे.
९ ऑगस्ट रोजी आम्ही विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून राज्य सरकारला एक निवेदन देणार आहोत.
त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही आमच्या मागण्या सरकारकडे मांडणार आहोत.
आमच्या मागण्यांवर जर राज्य सरकारने निर्णय घेतला नाही तर मग आम्ही निर्णय घेणार आहोत”,
असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar On Pimpri Chinchwad Assembly | पिंपरी चिंचवडला खिंडार पडल्यानंतर अजित पवारांची
विधानसभेबाबत भविष्यवाणी, म्हणाले…