Badlapur BJP Nagarsevak | बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वीकृत नगरसेवक; भाजपच्या निर्णयाने राज्यभरात संताप

Badlapur BJP Nagarsevak | Accused in Badlapur sexual assault case accepted as corporator; BJP's decision angers the entire state

बदलापूर :  Badlapur BJP Nagarsevak | बदलापुरमध्ये राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारा निर्णय समोर आला आहे. बदलापूरच्या शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील सहआरोपी असलेल्या तुषार आपटेला भारतीय जनता पक्षाने कुलगाव–बदलापुर नगरपरिषदेचे ‘स्वीकृत नगरसेवक’ म्हणून संधी दिली आहे. या नियुक्तीमुळे विरोधकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, नैतिकतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

दोन वर्षांपूर्वी बदलापुरमधील एका शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणात शाळा व्यवस्थापनाशी संबंधित काही पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये तुषार आपटे यांचे नाव सहआरोपी म्हणून समोर आले होते. त्यांना अटकही झाली होती आणि सध्या ते जामिनावर आहेत. प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

भाजपकडून मात्र दोष सिद्ध झालेला नसल्याने त्यांना संधी देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. पक्षाचे म्हणणे आहे की, कायदेशीरदृष्ट्या ते निर्दोष मानले जातात. मात्र विरोधकांचा आक्षेप असा आहे की, इतक्या गंभीर प्रकरणाशी संबंधित व्यक्तीस सार्वजनिक पद देणे समाजाला चुकीचा संदेश देणारे आहे.

या निर्णयामुळे बदलापुरमध्ये राजकीय आणि सामाजिक पातळीवर तीव्र चर्चा सुरू झाली असून, आगामी काळात हा मुद्दा अधिक तापण्याची शक्यता आहे.

You may have missed