Badlapur School Girl Incident | ‘भाजपचा कार्यकर्ता असला तरी कारवाई व्हावी’, बदलापूर प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचे भाष्य, म्हणाले,”भाजपाचे कार्यकर्ते असतील तर निबंध लिहून…”

Uddhav-Thackeray

बदलापूर : Badlapur School Girl Incident | बदलापूरमध्ये आदर्श विद्यालयातील चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेबाबत प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. आज (दि.२०) सकाळी ११ वाजल्यापासून संतप्त आंदोलकांनी बदलापूर स्थानकावर उतरून लोकल सेवाच बंद पाडली आहे. तसंच आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक देखील केली.

आता या सगळ्या प्रकरणाला राजकीय वळण देखील लागले आहे. याच घटनेबाबत बोलताना शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक मोठे विधान केले आहे. बदलापूर मधील ज्या शाळेत ही दुर्दैवी घटना घडली ती आदर्श विद्यालयात शाळा ही भाजपच्या लोकांशी संबंधित होती असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

एका बाजूने आपण राज्यात लाडकी बहीण योजना आणत असतानाच आपल्या राज्यात या लाडक्या बहिणीच नाही तर त्यांच्या छोट्या छोट्या मुलीही असुरक्षित आहेत. त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बदलापूर येथे घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावर भाष्य केले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले,”अशा घटनांचं राजकारण करता कामा नये. आम्ही आमच्या कार्यकाळात शक्ती विधेयक आणणार होतो. विधेयकाचा मसुदा तयार होता. त्यावेळी विधानसभेचे अधिवेशन कोरोनामुळे दोन ते तीन दिवसांचं झालं होतं. त्यामुळं. आमचे सरकार गद्दारांनी पाडलं म्हणून आम्ही हे विधेयक आणू शकलो नाही. (Badlapur School Girl Incident)

आता त्यांनी हे विधेयक रखडवलं आहे.
हे विधेयक आणून या बलात्काऱ्यांना या शक्ती विधेयकाची खरी शक्ती दाखवून देण्याची जबाबदारी त्यांची आहे,
असं म्हणत मी तर असंही ऐकलं आहे की बदलापूरची ती शाळा भाजपच्या कार्यकर्त्यांशी संबंधित आहे, असा दावा त्यांनी केला.

” मी यात राजकारण आणत नाही. तसा माझा हेतूही नाही.
कोणताही कार्यकर्ता असला अगदी भाजपाचा कार्यकर्ता असला तरी विनाविलंब त्याच्याविरुद्ध कारवाई झाली पाहिजे.
कार्यकर्ते कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना कायद्याच्या कक्षेत आणलंच पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

वरळीतील हिट अँड रन आरोपी मिहीर शाह देखील आता मुक्त आहे.
त्यांनी त्याला निबंध लिहायला सांगितला असावा.
त्याचप्रमाणे आता यात भाजपाचे कार्यकर्ते असतील तर निबंध लिहून घेऊन त्यांना सोडून देणार आहात का? संपूर्ण जग आता बघत आहे” , असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sunil Tatkare On Mahendra Thorve | आमदार महेंद्र थोरवेंच्या टीकेला तटकरे, अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – “महेंद्र थोरवेला मी मोजत नाही”

Pune Water Supply | पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

Shivsena Eknath Shinde Vs NCP Ajit Pawar | “राष्ट्रवादी हा विश्वासघातकी पक्ष” शिंदे गटाच्या आमदाराची टीका; महायुतीत कलगीतुरा रंगला

You may have missed