Bajirao Road Pune News | वाहतूक पोलिसांना खरंच वाहतूक कोंडी सोडवायचीय! दुतर्फा पार्किंगमुळे ‘बाजीराव रस्ता’ कोंडीत अडकलाय : पोलिसांचे दुर्लक्ष?

पुणे : Bajirao Road Pune News | शहराच्या मध्यवर्ती पेठेतील शिवाजी आणि बाजीराव रस्ता या दोन्ही रस्त्यांवर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. यापैकी बाजीराव रस्त्यावर सम विषम पार्किंग असतानाही रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अगदी दुचाकीपासून मालवाहतुकीचे टेम्पो सर्रास उभे राहात असल्याने या कोंडीत भर पडत आहे. वर्षानुवर्षे येथे नियमांचे उल्लंघन होत असताना वाहतूक पोलिस त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने ‘पोलिसांना’ खरंच वाहतूक कोंडी सोडवायचीय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नुकतेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील टॉमटॉम या संस्थेने वाहतूक कोंडीमध्ये पुणे हे देशात तिसरे तर जगामध्ये चवथ्या क्रमांकाचे शहर असल्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यापुर्वीही पुणे वाहतूक कोंडीत पहिल्या दहा शहरांमध्येच राहीले असून आता ते चवथ्या क्रमांकापर्यंत पोहोचल्याने प्रशासनाच्या वाहतूक कोंडी सोडविण्याच्या प्रयत्नांबाबत शंका उपस्थित होउ लागल्या आहेत.
शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत आल्यानंतर वाहतूक कोंडी ही जवळपास सवयीचा भाग बनली आहे. शहराला दक्षिणोत्तर जोडणारा शिवाजी आणि बाजीराव रस्ता आणि पुर्व पश्चिम जोडणारा लक्ष्मी आणि टिळक रस्ता हे प्रमुख रस्ते आहेत. जुन्या पेठेतील या रस्त्यांची रुंदी वाढविण्यास मर्यादा असल्याने कालपरत्वे शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता आणि लक्ष्मी रस्ता हे रस्ते वाहतुकीसाठी एकेरी करण्यात आले आहेत. परंतू यानंतरही केवळ रस्त्याच्या कडेला वाहन पार्किंगचे नियम पाळले जात नसल्याने तसेच अतिक्रमणांमुळे रस्त्यांची कॅरेज विडथ् कमी होउन मोठ्याप्रमाणावर वाहतूकीची कोंडी होते. सणवाराला तर या रस्त्यांवरून वाहने अगदी कासवाच्या गतीने धावताना दिसतात.
बाजीराव रस्त्यावरील नातूबाग मित्र मंडळापासून शनिपार चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा अगदी मालवाहतुकीचे टेम्पो, मोटारी आणि दुचाकीदेखिल तासंनतास दुतर्फा लावली जातात. शनिपार चौकातून लक्ष्मी रस्त्यावरील लिंबराज महाराज रस्त्या दरम्यान तुळशीबागेच्या बाहेर रिक्षा चालक सर्रास ग्राहकाची वाट पाहात कडेलाच रिक्षा लावून उभे असतात. लिंबराज महाराज चौकापासून अप्पा बळवंत चौकाकडे जाताना डाव्या बाजूला दुचाकी आणि चारचाकी डबल पार्किंगमध्ये उभ्या केल्या जातात. आणि अप्पा बळवंत चौकापासून अगदी शनिवार वाड्यापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला सम विषम तारखेचे बंधन तोडून दोन्ही बाजूला वाहने उभी केली जातात.
या रस्त्यावरून दुचाक, चार चाकी, रिक्षा आणि पीएमपीच्या बसेस मोठ्या संख्येने धावतात. परंतू रस्त्याच्या कडेला असलेल्या बेकायदा पार्किंगमुळे वाहतुकीची गती कमी होवून वाहतूक कोंडीला हातभारच लागतो. रस्त्याच्या कडेला अतिक्रमण होउ नये म्हणून महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पक्षकाने धडक कारवाईची व्हॅनच उभी केली आहे. मात्र, येथील प्रत्येक चौकात वाहतूक पोलिस असताना बेकायदेशीर रित्या पार्किंग केलेल्या वाहनांवरील कारवाईकडे त्यांचे लक्ष नसते. वरिष्ट अधिकारी देखिल केवळ सिग्नल जंपिंग, विधाउट हेल्मेट वाहन चालवणे अशाच कारवायांमध्ये मग्न असतात. यामुळे पोलिसांना वाहतूक सुधारणेत खरचं रस आहे? असा प्रश्न निर्माण होतो. (Bajirao Road Pune News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Union Budget 2025 Updates | कृषी क्षेत्रासाठी ‘पंतप्रधान धनधान्य योजना’,
निर्मला सीतारमण यांची अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा