Bala Bhegade | माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंची पोलिसात धाव; मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात केलं होतं वक्तव्य
तळेगाव दाभाडे : Bala Bhegade | राज्यात आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापलेला आहे. अशातच भाजपाचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी २ ऑगस्ट रोजी झालेल्या भाजपच्या मेळाव्यामध्ये मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या विरोधात एक वक्तव्य केले होते. मनोज जरांगे हे महाविकास आघाडीची सुपारी घेऊन मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचा गंभीर आरोप माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केला होता.
या वक्तव्यावरून मराठा मोर्चाचे पदाधिकारी दुखावले गेले. विनोद पोखरकर (Vinod Pokharkar) यांनी बाळा भेगडे यांना फोन करून जाब विचारला होता. धमकी वजा इशारा दिला होता. त्या संभाषणाची ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
त्यानंतर भेगडे यांनी मराठा मोर्चाचे विनोद पोखरकर यांच्या विरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. भेगडे यांनी बदनामी झाल्याचा उल्लेख तक्रारीत केला आहे. स्वतः बाळा भेगडे यांनी याबाबत तळेगाव पोलीस ठाण्यात उपस्थित राहून तक्रार दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी बाळा भेगडे आणि विनोद पोखरकर यांच्या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.
पोखरकर यांनी शिवीगाळ करत धमकी दिल्याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात भेगडे यांनी तक्रार दिली आहे.
तळेगाव पोलीस ठाण्यात याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bala Bhegade)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sinhagad Road Pune Flood | डोळ्यांदेखत बुडाला संसार; सिंहगड रस्त्यावरील पुरात कुटुंबाचे नुकसान
Pune Crime News | गटारीला जेवायला घालून कोयत्याने डोक्यात वार करुन केले गंभीर जखमी
Murder Due To Immoral Relationship | अनैतिक संबंधाच्या संशयावरून गुप्तीने भोसकून तरुणाचा खून
Pune Crime Court News | अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्या प्रकरणी बॅंक कर्मचाऱ्याला जामीन मंजूर