Balasaheb Thorat On Ajit Pawar | “मविआच्या काळातही अजित पवारांकडून निधी वाटपात दुजाभाव”, काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

संगमनेर: Balasaheb Thorat On Ajit Pawar | पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्या खात्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. “अर्थ खात्यासारखे नालायक खाते नाही. अनेक वेळा नकाराचा शेरा मिळून फाईल परत येत असे. पण पाठपुराव्यामुळे आमचे काम झाले. दोन अडीच महिन्यात येणारे विघ्न दूर करण्यासाठी प्रयत्न करा. स्वार्थाबरोबर परमार्थही साधावा लागतो,” असे विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले होते. त्यानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे. (Balasaheb Thorat On Ajit Pawar)
त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात देखील अजित पवार निधी देताना दूजाभाव करत होते, असा मोठा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले, पाच वर्ष निधी वाटपात भेदभाव झाला. काही आमदारांना प्रचंड निधी तर काहींना निधीच नाही. पाच वर्षे भेदभाव करण्याचे काम अर्थ विभागाकडून झाले आहे. पाच वर्षे हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय.
महाविकास आघाडीच्या काळात आम्ही देखील तक्रार केली होती,
असा गौप्यस्फोट अजित पवारांच्या निधी वाटपावर बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
संगमनेर शहरातील आपल्या निवासस्थानी बाळासाहेब थोरात यांनी गणरायाचे पूजन केले. त्यावेळी ते बोलत होते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार
PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी