Balasaheb Thorat On Harshvardhan Patil | ‘हर्षवर्धन पाटील यांचा निर्णय चुकला, ते पुन्हा परततील’, काँग्रेसच्या बड्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – ‘त्यांना भाजपात जाऊ नका म्हणून आग्रहाने सांगितलं,पण…’

मुंबई : Balasaheb Thorat On Harshvardhan Patil | विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) तोंडावर आहेत. दरम्यान भाजपाकडून (BJP) उमेदवारी मिळत नसल्याचे पाहात आता हर्षवर्धन पाटील भाजप सोडण्याच्या विचारात आहेत. इंदापूर विधानसभेची (Indapur Assembly) जागा महायुतीत (Mahayuti) अजित पवार गटाला (Ajit Pawar NCP) गेली आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांचे राजकीय भवितव्य काय? असा प्रश्न उपस्थित होतोय.
https://www.instagram.com/p/DAf7shdCxzj
त्यामुळे आता हाती तुतारी (Tutari) घेणं किंवा अपक्ष लढणे एवढेच पाटील यांच्या हातात आहे. दरम्यान, या घडामोडीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महत्वाचे विधान केले आहे. भाजपमधून हर्षवर्धन पाटील बाहेर पडणार असल्याच्या चर्चेवरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
https://www.instagram.com/p/DAfkBKHivvM
“हर्षवर्धन पाटील यांना आतापर्यंत मोठ्या संधी मिळाल्या आहेत. त्यांच्यात तेवढी क्षमता आहे, ते आमचे मित्र आहेत. त्यांनी भाजपाकडे जाऊन चुकले की काय असं त्यांनाही वाटत आहे. मी त्यांना जाऊ नका म्हणून आग्रहाने सांगितलं होतं. आपलं व्यक्तिमत्व काँग्रेसच्या वाटेवर घडलं आहे, आता पुन्हा परत येतील असं वाटतंय, असंही आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हंटल आहे. (Balasaheb Thorat on Harshvardhan Patil)
https://www.instagram.com/p/DAfXN8QpcLA
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)