Balewadi Pune Crime News | बालेवाडीतील गॅरेजवर 5 अल्पवयीन मुलांना घेऊन तिघांनी घातला दरोडा ! कामगारांना मारहाण करुन लुबाडले

Chaturshringi Police

चतु:श्रृंगी पोलिसांनी 12 तासात उघडकीस आणला गुन्हा

पुणे : Balewadi Pune Crime News | दुचाकीवरुन आलेल्या ९ ते १० जणांच्या टोळक्याने बालेवाडी येथील एका गॅरेजवर दरोडा टाकला. गॅरेजमधील लोकांना हत्याराने धमकावून त्यांना मारहाण करुन लुबाडले. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी तिघांना अटक केली असून ५ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. ही घटना बालेवाडी येथील विलास तात्या बालवडकर चौकातील रविराज ऑटोमोबाईल्स अँड वॉशिंग सेंटर येथे शुक्रवारी सायंकाळी साडेपाच ते पावणे सहा वाजण्याच्या दरम्यान घडली. (Arrest In Robbery Case)

https://www.instagram.com/p/DAJM7t8pKwn

अलीम सय्यद (वय १९), देवा शिरोळे (वय २०) आणि मोहन अडागळे (वय १९) यांना अटक केली असून अन्य ५ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. याबाबत सिद्धेश्वर दिगंबर ढेरे (वय ३४, रा. पाटील वस्ती, बालेवाडी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ९ ते १० जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

https://www.instagram.com/p/DAJPd6jpVn9

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे रविराज ऑटोमोबाईल्स अँड वॉशिंग सेंटर हे गॅरेज आहे. ते गॅरेजमध्ये असताना तीन वेगवेगळ्या दुचाकीवर चेहरा झाकलेले ९ ते १० जण गॅरेजमध्ये शिरले. त्यांच्याकडे असलेल्या लोखंडी हत्याराने व लाकडी काठ्यांनी फिर्यादी व गॅरेजमधील इतर लोकांना धमकावले. तसेच मॅकेनिक व गिर्‍हाईक यांना त्यांच्याकडील हत्याराने मारुन जखमी केले. गॅरेज कामाची मिळालेली रक्कम व इतर लोकांची मिळून रोख ४९ हजार रुपये तसेच फिर्यादी यांचा मोबाईल असा ६९ हजार रुपयांचा माल जबरदस्तीने हत्याराचा धाक दाखवून काढून घेऊन निघून गेले.

https://www.instagram.com/p/DAK72NApqWE

दरोड्याच्या या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव (DCP Himmat Jadhav), सहायक पोलीस निरीक्षक अनुजा देशमाने (ACP Anuja Deshmane), वरिष्ठ पोलीस निरीक्षक बोळकोटगी (Sr PI Mahesh Bolkotgi), पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे (PI Yuvraj Nandre) यांनी घटनास्थळाला भेट दिली.

https://www.instagram.com/p/DAK2wopCaHq

फिर्यादीकडून मिळालेले वर्णन आणि तपास पथकाला मिळालेल्या माहितीवरुन आरोपी पिंपळे गुरव, सांगवी येथे असल्याच्या माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.

https://www.instagram.com/p/DAKsk3Kiixv

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार (IPS Amitesh Kumar),
सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील (IPS Manoj Patil), पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव,
सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, विजयानंद पाटील (PI Vijayanand Patil), सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील (API Narendra Patil), पोलीस उपनिरीक्षक प्रणील चौगुले (PSI Pranil Chougule) , हवालदार वाघवले, मोमीन, दुशिंग, तांदळे, दांगडे, माने, शिर्के, दुर्गे, पोलीस अंमलदार खरात, भांगले, तरंगे यांनी केली आहे.

https://www.instagram.com/p/DAKn0jni3HB

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vanraj Andekar Murder | वनरात आंदेकर खून प्रकरणात गुन्हेगारांमधील दुवा साधणार्‍या गुन्हेगाराला अटक

Hadapsar Pune Crime News | दारुच्या व्यसनाविषयी आई, पत्नीला सांगत असल्याने तरुणाचा खून !
सोलापूरहून आरोपीला घेतले ताब्यात, 12 तासात गुन्हा उघडकीस (Video)