Ban On Heavy Vehicles In Pune | पुणे : गणेशोत्सव काळात मध्यवर्ती भागातील १२ रस्त्यांवर जड वाहनांना बंदी
पुणे : Ban On Heavy Vehicles In Pune | गणेश उत्सव काळात नागरिकांची साहित्य खरेदी व देखावे पाहण्यासाठी मध्यवर्ती पेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर गदी होत असते. त्यामुळे सुरक्षेची उपाय योजना म्हणून व रस्त्यांवरुन धावणार्या जड वाहनांमुळे नागरिकांना असुरक्षितता निर्माण होऊन त्यांच्या जिविताच धोका होऊ नये, म्हणून वाहतूक शाखेने पेठांमधील १२ रस्त्यांवर जड वाहनांना २४ तास बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी ५ ते १९ सप्टेंबर दरम्यान गणपती विसर्जनापर्यंत राहणार आहे. (Pune Ganeshotsav)
शास्त्री रोड – सेनादत्त चौकी चौक ते अलका चौक
टिळक रोड – जेधे चौक ते अलका चौक
कुमठेकर रोड – शनिपार ते अलका चौक
लक्ष्मी रोड – संत कबीर चौक ते अलका चौक
बाजीराव रोड -पुरम चौक ते गाडगीळ पुतळा
शिवाजी रोड – गाडगीळ पुतळा ते जेधे चौक
कर्वे रोड – नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक
फर्ग्युसन कॉलेज रोड – खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक
जंगली महाराज रोड – स़ गो़ बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौक
सिंहगड रोड – राजाराम ब्रीज ते सावरकर चौक
मुदलियार रोड/गणेश रोड – पॉवर हाऊस -दारुवाला – जिजामाता चौक – फुटका बुरुज चौक
या वाहतूक बदलाचा अवलंब करुन गणेशोत्सव शांतेते पार पाडण्यास व वाहतूक सुरळीत ठेवण्यास वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा