Ban On Laser Beam Lights In Pune | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आता ‘लेझर बीम लाईट’वर बंदी, नियम न पाळल्यास कडक कारवाई होणार, दहीहंडीपासून अंमलबजावणी

पुणे : Ban On Laser Beam Lights In Pune | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर (Pune Ganeshotsav) पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) यांनी पुणे शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्यांची बैठक घेतली होती. या बैठकीनंतर गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे स्पीकरवर लावण्यात येणार्या लेझर बीम लाईटवर बंदी घालण्याचा निर्णय पोलिस आयुक्तांनी घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी दहीहंडीपासूनच होणार आहे.
यंदाच्या गणेशोत्सवामध्ये कोणी लेझर बीम लाईटचा वापर केल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तांनी म्हटले आहे. यंदा 27 ऑगस्ट रोजी दहीहंडी आणि 9 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. या दोन्ही सणांदरम्यान पुण्यामध्ये लेझर बीम लाईट वापरण्यास बंदी असेल.
पुण्यात लेझर बीममुळे नेत्रपटलाला इजा झाल्याची 15 प्रकरणे गेल्यावर्षीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर समोर आली होती. या लेझर बीम लाइटमुळे डोळ्यांना गंभीर त्रास झाल्याची प्रकरणे वाढत गेली. काही तरुणांच्या दृष्टीवर परिणाम झाला. त्यांना दिसणे कमी झाले. त्यामुळे लेझर बीम लाइटवर बंदीची मागणी केली जात होती.
यंदा दहीहंडी आणि गणेशोत्सवामध्ये कोणी लेझर बीम लाईट लावल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध