Baner Pune Crime News | मजुराच्या डोक्यात वार करुन गळ्यात दोरी गुंडाळून आत्महत्येचा केला बनाव; दारुच्या नशेत केला खुन, बाणेरमधील बांधकाम साईटवरील घटना

पुणे : Baner Pune Crime News | बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर डोक्यात, तोंडावर मारहाण करुन त्याचा खून केला. त्यानंतर, त्याच्या गळ्यात दोरी गुंडाळून लटकवून आत्महत्या केल्याचा बनाव केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याप्रकरणी बाणेर पोलिसांनी (Baner Police) एकाला अटक केली आहे. (Arrest In Murder Case)
सुनिल अमोल टुडु (वय ३२, रा. मिलिनिअम बांधकाम साईटचे लेबर कॅम्प, मिरा रेसिडन्सीच्या मागे, पॅन कार्ड क्लब, बाणेर) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. दारुच्या नशेत मारहाण करुन खुन केल्याचा कारण समोर आले आहे.
पोलिसांनी धोन मोटका टुडु (वय २३, रा. न्यू लेबर कॅम्प, पॅन कार्ड क्लब रोड, बाणेर) याला अटक केली आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक महेश थिटे यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिल टुडु हा मुळचा झारखंड येथील राहणारा आहे. तो झारखंडवरुन सोमवारीच पुण्यात मजुरी कामासाठी आला होता. तो धोन टुडु याच्याकडे आला होता. मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा तेथे सुनिल याचा गळ्यात दोरी बांधून लटकविलेल्या अवस्थेत मृतदेह होता. त्याने गळफास घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत होते. मृतदेह खाली उतरविल्यानंतर त्याच्या डोक्यात, तोंडावर मारहाण केल्याच्या खुणा दिसून आल्या. शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी डोक्यात, नाका, तोंडावर मारहाण केल्याचे मृत्यु झाल्याचे सांगितले. त्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन धोन टुडु याला अटक केली.
सुनिल टुडु हा सोमवारी दुपारी पुण्यात आला होता. धोन हा यापूर्वीच पुण्यात आला असून या बांधकाम साईटवर मजुर म्हणून काम करतो. गावाकडील असल्याने सुनिल हा धोन याला ओळखत होता. सोमवारी दुपारी पुण्यात आल्यावर तो धोन याच्याकडेच आला. त्यानंतर सायंकाळी दोघेही दारु पिण्यास गेले होते. त्यानंतर रात्री त्यांच्यात वाद झाला. दारुच्या नशेत धोन याने सुनिल याला मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यु झाला. त्यानंतर त्याने आत्महत्येचा बनाव करण्यासाठी त्याच्या मृतदेहाच्या गळ्यात दोरी गुंडाळून तो लटकविला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी धोन टुडु याच्याकडे चौकशी केली. परंतु तो काही सांगायला तयार नाही. सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर तपास करीत आहेत. (Baner Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Gold-Silver Rate Today | चांदीच्या दरात आज आश्चर्यकारक घसरण, जाणून घ्या काय आहे सोन्याचा दर,
दिल्लीपासून मुंबईपर्यंतचे दर जाणून घ्या
Market Yard Pune Police News | छोट्याश्या खोलीत धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग;
मार्केटयार्ड पोलिसांनी आंबेडकर नगरात कारवाई, 5 मोठे तर 12 छोटे गॅस सिलेंडर जप्त
Sanjay Raut Critisice Sharad Pawar | शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्याने संजय राऊतांचा संताप,
म्हणाले ”कोण कोणाला टोप्या घातलंय आणि…”