Baramati Assembly Constituency | बारामतीत अजित पवारांच्या विरोधात शरद पवार गटाचा उमेदवार ठरला? जयंत पाटलांनी दिले संकेत

sharad pawar vs ajit pawar

बारामती : Baramati Assembly Constituency | लोकसभा निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar) यांना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात रिंगणात उतरवले होते. संपूर्ण निवडणूक प्रचार काळात त्यांनी बारामतीमध्ये तळ ठोकला होता. मात्र, सुप्रिया सुळे या तब्बल एक लाखांहून अधिक मताधिक्याने निवडून आल्या.

आता आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) अजित पवार यांना कोंडीत पकडण्याची रणनीती शरद पवारांच्या पक्षाने (Sharad Pawar NCP) आखली आहे. त्यासाठी त्यांनी शरद पवारांचे नातू युगेंद्र (Yugendra Pawar) यांना रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) जागावाटप अद्याप झाले नसल्याने जयंत पाटील (Jayant Patil) यांनी थेट उमेदवारी जाहीर करणं टाळले असले तरी त्याबाबतचे संकेत दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ‘शिवस्वराज्य’ यात्रा (Shivswaraj Yatra) सध्या सुरू आहे. याच यात्रेचा भाग म्हणून बारामतीत काल जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना जयंत पाटील यांनी बारामती विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवर अप्रत्यक्ष भाष्य केले आहे. बारामती विधानसभा निवडणूक युगेंद्र पवार हेच लढवतील असे संकेत त्यांनी यावेळी दिले.

जयंत पाटील म्हणाले, “युगेंद्र पवार हे अलीकडं राजकारणात रस घेऊ लागले आहेत.
पवार साहेबांच्या लोकसभेच्या प्रचारापासून ते आता सगळीकडे फिरू लागले आहेत.
तरुण नेतृत्वाला कसा पाठिंबा मिळू शकतो हे युगेंद्रदादांच्या रुपाने आपण गावागावात बघतो.
ते जिथं-जिथं जातायत, तिथं कार्यकर्ते उत्साहाने पुढं येत आहेत.

सार्वजनिक जीवनात युगेंद्र दादांनी लक्ष घालायला सुरुवात केल्यापासून कार्यकर्तेही त्यांना साथ देत आहेत.
बारामती विधानसभेचे भविष्य नव्या रक्ताकडे, नव्या हातात देण्याची उत्सुकता सर्वांना दिसतेय.
हे कामही सगळे कार्यकर्ते योग्य पद्धतीने करतील”, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीत भाजपाचा 150 पेक्षा अधिक जागांवर लढण्याचा निर्धार ; बैठकीत मोठा निर्णय

Newly Married Couple Suicide | अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न, दोघेही पुण्यात नोकरीला; गावाकडे परतले अन् संपवलं जीवन

Instagram Love Story | पंजाबच्या तरुणीचं रत्नागिरीच्या तरुणाशी इन्स्टावर प्रेम जडलं; पंजाबवरून रत्नागिरी गाठली अन्…

Pune Crime News | मेंदूतील रक्तस्त्रावाने पोलीस कोठडीतील आरोपीचा मृत्यु

You may have missed