Baramati Assembly Election 2024 | ‘बारामतीकर युगेंद्र पवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील’, युगेंद्र पवारांच्या उमेदवारीवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले – ‘बारामतीकरांची मला जेवढी माहिती आहे त्यानुसार…’
बारामती: Baramati Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) घोषणा झालेली आहे. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल असणार आहे. दरम्यान आज बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात तुतारी (Tutari) चिन्हावर लढण्यासाठी युगेंद्र पवार (Yugendra Pawar ) यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित होते. ( Baramati Assembly Election 2024)
युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीबाबत शरद पवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. बारामतीकर युगेंद्र पवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
शरद पवार म्हणाले, ” मी हे म्हणणं योग्य आहे की नाही पण बारामतीकरांची मला जेवढी माहिती आहे, तेवढी माहिती क्वचितच कोणाल असू शकेल. माझा बारामतीकरांवर पूर्ण विश्वास आहे. मला महाराष्ट्राच्या राजकारणात शक्ती देण्याचं काम बारामतीकरांनी केलं. त्याची सुरुवात १९६५ सालापासून ते आजपार्यंत आहे.
मी आतापर्यंत इतक्या निवडणुकींना उभा राहिलो. सुरुवातीच्या काळात मला इथं राहावं लागायचं.
नंतरच्या कालावधीत माझी जबाबदारी बारामतीकरांनी घेतली.
त्यामुळे या बारामतीकरांवर माझा पूर्ण विश्वास आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून
युगेंद्र पवार यांना मोठ्या मतांनी विजयी करतील”, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maval Assembly Election 2024 | मावळ विधासभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी; यंदाची निवडणूक रंगतदार होणार
Sharad Pawar NCP Vs Ajit Pawar NCP | पुण्यातील 21 पैकी 8 जागांवर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांना भिडणार;
कोणत्या पवारांची पॉवर निर्णायक ठरेल? राजकीय वर्तुळात चर्चा