Baramati Assembly Election 2024 | ‘तीन ठिकाणांवरून ऑफर होती, यंदा बारामतीतून उभा राहणार नव्हतो’, अजित पवारांचे वक्तव्य
बारामती: Baramati Assembly Election 2024 | बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar) यांचा पराभव झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बारामती विधानसभा मतदारसंघात लढणार नाहीत अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. अजित पवार शिरूर मतदारसंघातून (Shirur Assembly Election 2024) निवडणूक लढतील अशी एक मांडणी केली जात होती. दरम्यान, यावरच अजित पवार यांनी भाष्य केले आहे. (Baramati Assembly Election 2024)
बारामतीतून विधानसभेच्या निवडणुकीला उभं राहायचं नाही, असे मी सुरुवातीला ठरवलं होतं. मला महाराष्ट्रातून तीन ठिकाणांहून निवडणूक लढविण्याची ऑफर होती, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.१) बारामतीत बोलताना केला.
अजित पवार म्हणाले, ” सुरुवातीला मी म्हणत होतो की, बारामतीत मी उभाच राहत नाही. मला, महाराष्ट्रातून तीन मतदारसंघांतून निवडणूक लढविण्यासाठी ऑफर होती. पुणे जिल्ह्यातील पुरंदर, शिरूर- हवेली या दोन मतदारसंघातून तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा तेथील लोकांचा आग्रह होता, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
“तुम्ही एवढी विकास कामं केली आहेत आम्ही तर तुम्हाला बिनविरोध निवडून दिलं असतं
असे तेथील कार्यकर्ते म्हणत होते. जिथं पिकतं तिथं विकत नाही”, अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
लोकसभा निवडणुकीतील अनुषंगानेच अजित पवार यांनी जुनी गोष्ट पुन्हा मांडली आहे.
अजित पवार म्हणाले, माझी प्रशासनावर जी पकड आहे, तशी ती इतर कोणाची नाही.
भावनिक होऊन काय करायला गेला, तर तो तुमचा अधिकार आहे,
असे सांगून भावनिक आवाहनाकडे लक्ष देऊ नये, असेही त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा