Baramati Assembly Election 2024 | बारामतीत अजित पवारांच्या विरोधात तुतारीचा उमेदवार ठरला? राष्ट्रवादी शरद पवार गटातील बड्या नेत्याचे विधान; म्हणाले…

Ajit Pawar-Sharad Pawar

बारामती: Baramati Assembly Election 2024 | मागील काही दिवसांपासून अजित पवार (Ajit Pawar) बारामती विधानसभेतून लढणार नसल्याची चर्चा सुरु होती. आज राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ३८ उमेदवारांची यादी जाहीर झाली. त्यामध्ये अजित पवार बारामतीतून लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Baramati Assembly Election 2024)

दरम्यान अजित पवार यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) कोण लढणार? अशी चर्चा सुरु आहे. याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी महत्वाचे विधान केले आहे.

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज (दि.२३) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना पत्रकारांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून कोण लढणार असा प्रश्न केला. यावेळी आव्हाड यांनी युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांच्या नावाचा उल्लेख केला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “बारामती विधानसभेतून कदाचित मला असं वाटतंय की युगेंद्र पवार हे आमचे उमेदवार असतील. मला अजून याबाबतीत खात्री नाही”, असंही आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“महाविकास आघाडीमध्ये एखाद-दुसऱ्या जागेवर चर्चा सुरू आहे.
पुढील काही दिवसात ही चर्चा पूर्ण होईल. माझा विधानसभा उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी
शरद पवार येणार आहेत”, असंही आव्हाड यांनी म्हंटले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune ACB Trap News | 5 लाख रुपयांची लाचेची मागणी करुन 2 लाखांची लाच घेताना
महावितरणचा कार्यकारी अभियंता जाळ्यात

Eknath Shinde-Amit Shah | एकनाथ शिंदेंनी थेट अमित शहांचा सल्ला धुडकावला

You may have missed