Baramati Pune Crime News | मावस बहिणीशी बोलत असल्याच्या कारणावरुन 19 वर्षीय तरुणावर कोयत्याने वार करुन खून
पुणे : Baramati Pune Crime News | मावस बहिणीशी बोलत असल्याचा राग मनात धरुन तिघांनी मिळून एका तरुणाचा कोयत्याने वार (Koyta Attack) करुन खुन करण्यात आला. अनिकेत सदाशिव गजाकस (वय १९, रा. देसाई इस्टेट, बारामती) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Baramati Murder Case)
याबाबत अनिकेतचा भाऊ अॅड. अभिषेक सदाशिव गजाकस (वय २५, रा. देसाई इस्टेट, बारामती) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नंदकिशोर पंजाबराव अंभोरे (रा. प्रगतीनगर, ता. बारामती), महेश नंदकुमार खंडाळे (ता. तांदुळवाडी रोड, जिजामातानगर, बारामती) आणि संग्राम खंडाळे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना प्रगतीनगर येथील क्रिऐटिव्ह अॅकॅडमीकडून टी सी कॉलेजकडे जाणार्या रोडवर गुरुवारी रात्री साडेदहा वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत हा आरोपींच्या मावस बहिणीशी बोलत असल्याने त्यांच्या मनात राग होता. त्यावरुन तिघांनी अनिकेत याच्यावर कोयत्याने वार करुन त्याचा खुन केला. सहायक पोलीस निरीक्षक गजानन चेके (API Gajanan Cheke) तपास करीत आहेत. (Baramati Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत