Baramati Pune Crime News | पुणे : जुन्या बॉयफ्रेंडला जेलमध्ये पाठवण्यासाठी चाैघांनी सामूहिक बलात्कार केल्याचा अल्पवयीन मुलीचा बनाव

Gang-Rape

पुणे / बारामती: Baramati Pune Crime News | जुन्या मित्राला जेलमध्ये पाठवण्यासाठी अल्पवयीन मुलीने दुसऱ्या बॉयफ्रेंड सोबत सामूहिक बलात्काराची फिल्मी स्टाईल स्टोरी रचल्याची खळबळजनक घटना बारामती मधून समोर आली आहे. (Fake Gang Rape Case)

मिळालेल्या माहितीनुसार, (दि.१३) बारामती मधील सामाजिक कार्यकर्ते मछिंद्र टिंगरे यांना अल्पवयीन मुलीने फोन करून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे सांगितले. एका ऊसाच्या शेतात नेवून त्या मुलाने आणखी तीन मुलांना बोलावून घेत माझ्यावर सामूहीक अत्याचार केल्याचे म्हंटले. त्यानंतर टिंगरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना यांची माहिती दिली. त्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली. (Baramati Police)

मुलगी अत्यंत हुबेहूब कथानक करत होती. अगदी ती फोनवर बोलत असताना रडत होती. त्यामुळे तिच्यासोबत असा काही प्रकार घडला असल्याचं नाकारता येत नव्हतं. वरिष्ठ पोलिसांनी देखील याची गंभीर दखल घेतली. (Minor Girl Fake Rape Case)

अल्पवयीन मुलीला महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मार्फत विश्वासात घेतलं. तिच्याकडे विचारपूस करण्यात आली. परंतु, अल्पवयीन मुलगी प्रत्येक वेळी- वेगवेगळी उत्तर देत होती. महिला अत्याचाराच्या या घटनेमुळे पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली होती. या प्रकरणात अजित पवारांनीही (Ajit Pawar) तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या.

त्यामुळे बारामती पोलीस आणखीनच दडपणाखाली आले. पोलिसांनी सीसीटीव्ही (CCTV Footage)
पाहणी करत तपास सुरु केला. मात्र मुलगी प्रत्येकवेळी आपले म्हणणे बदलत होती.
पोलीस वारंवार सांगूनही आणि विचारपूस करूनही अल्पवयीन मुलगी प्रश्नांची उत्तरे देत नव्हती.

अल्पवयीन मुलगी ही पोलिसांची दिशाभूल करत असल्याचं पोलिसांना संशय आला.
महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर सर्व फिल्मी स्टाईल कथानक समोर आलं. पहिल्या मित्राला जेलमध्ये पाठवण्यासाठी एका मालिकेतील घटना बघून दुसऱ्या मित्रांसोबत सोबत सामूहिक बलात्काराचा बनाव रचल्याचं मुलीनं अखेर पोलिसांना सांगितलं.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vande Bharat Express | पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे सोमवारी लोकार्पण; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
यांची माहिती, सोमवारपासून पुणे-कोल्हापूर-हुबळी फेऱ्यांना सुरुवात

Mahayuti News | ‘महायुतीत स्थानिक पातळीवर अजूनही कार्यकर्त्यांची मनं जुळलेली नाहीत’,राष्ट्रवादीच्या
बड्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – “ज्यांच्या बरोबर संघर्ष केला…”

Ajit Pawar At Narayanpur | उपमुख्यंत्री अजित पवार यांनी नारायणपूर येथे जाऊन वाहिली;
श्रीसदगुरु नारायण महाराजांना भावपूर्ण आदरांजली

You may have missed