Baramati Pune Crime News | घरातील पंख्याला शॉर्टसर्किट, झोपतेच पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू ; घटनेने परिसरात हळहळ

Baramati Crime

बारामती : Baramati Pune Crime News | टेबल पंख्याच्या वायरीचे करंट लोखंडी खाटेला लागल्याने खाटेवर झोपलेल्या पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवनाथ रामा पवार (वय-४०), संगीता नवनाथ पवार( वय-३८, दोघे रा.सांगवी ता. बारामती) असे मृत्यु झालेल्या पती-पत्नींची नावे आहेत.

अधिक माहितीनुसार, नवनाथ व संगीता हे दोघे पती-पत्नी रात्री साडेदहाच्या सुमारास जेवण करून झोपले होते. १ एप्रिल रोजी वीज पुरवठा खंडित झाला. रात्री बाराच्या सुमारास पुन्हा वीज आली. दरम्यान टेबल पंख्याच्या वायरला शॉर्ट सर्किट होऊन वायर जळून सदर वायरचा करंट लोखंडी खाटेला लागल्याने नवनाथ व संगीता यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी याबाबतची माहिती इतरांना समजली. सदर घटनेबाबत मयत नवनाथ यांचे चुलत भाऊ रामचंद्र हनुमंत पवार यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली. या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

You may have missed