Bavdhan Pune Crime News | वेंकीजचे संचालक बालाजी राव यांच्या वाढदिवस पार्टीत स्पिकरचा पहाटे अडीचपर्यंत दणदणाट; आयोजक कंपनीच्या सरव्यवस्थापकावर गुन्हा दाखल

Venky's director Balaji Rao's birthday party

पुणे : Bavdhan Pune Crime News | वेंकीज कंपनीचे संचालक बालाजी राव यांच्या वाढदिवसानिमित्त बावधनमधील कोकाटे वस्ती येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेथे पहाटे अडीचपर्यंत स्पीकरचा दणदणाट सुरु होता. हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police) एलईडी लाइट आणि मोठ्या आवाजात ध्वनिवर्धक लावून शांततेचा भंग, ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी वेंकीज कंपनीच्या सरव्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे.

आदिनाथ संभाजी मते Adinath Sambhaji Mate (रा. वेंकटेश्वरा हाऊस) असे गुन्हा दाखल झालेल्या सरव्यवस्थापकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेंकीज कंपनीचे संचालक बालाजी राव यांचा ८ डिसेंबर रोजी वाढदिवस असतो. त्यानिमित्ताने रविवारी कोकाटे वस्ती येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रात्री साडेअकरा ते पहाटे अडीच दरम्यान साऊंडच्या भिंती, लेझर लाइट शो केला. तसेच प्रसिद्ध गायकांच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमात लावलेल्या साऊंडच्या भिंतीमुळे परिसरात ध्वनी प्रदूषण झाले. याबाबत कोकाटे वस्ती परिसरातील रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. पहाटे अडीच वाजेपर्यंत हा दणदणाट सुरु असतानाही पोलिसांनी मात्र त्यात हस्तक्षेप केला नाही.

त्यानंतर दोन दिवसांनी पोलिसांनी पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम १५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३,
आर १३१ प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक महाले तपास करीत आहेत. (Bavdhan Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत

Kolhapur Crime News | कोल्हापूर: स्पर्धा परीक्षेतील अपयशाच्या नैराश्यातून युवकाने संपवलं जीवन

You may have missed