Beed Accident News | भरधाव बसची दुचाकीला धडक; दोनशे फुटापर्यंत नेले परफटत, अपघातात जि. प. शाळेतील शिक्षकाचा जागीच मृत्यू

बीड : Beed Accident News | भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बसने दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराला दुचाकीसह बसने जवळपास २०० फूट अंतरापर्यंत फरफटत नेले. यात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. फय्याज खान (वय-४५) असे मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.
बीडच्या गेवराई- शेवगाव राज्य महामार्गावरील महार टाकळी येथे सदरची दुर्दैवी घटना घडली. फैय्याज खान हे गेवराईच्या अर्ध पिंपरी याठिकाणी जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत होते. ते आपल्या गावालगत असलेल्या क्रिकेट मैदानावर रोज सकाळी क्रिकेट खेळण्यासाठी जात होते.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे आज देखील फय्याज खान सकाळी क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. क्रिकेट खेळून झाल्यानंतर ते घराकडे जाण्यासाठी निघाले होते. याच वेळी समोरून भरधाव वेगाने आलेल्या माजलगाव- पुणे या राज्य परिवहन महामंडळाच्या बसने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात शिक्षक फय्याज खान यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान अपघात घडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
तर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चकलांबा पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.
घटनेचा पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला. अपघात झाल्यामुळे महामार्गावर वाहतूक खोळंबली होती.
दरम्यान पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. (Beed Accident News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत