Beed Crime News | मंत्री दत्तात्रय भरणेंच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
बीड : Beed Crime News | ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बीडमध्ये मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शासकीय ध्वजवंदन सोहळा पार पडला. यावेळी दत्तात्रय भरणे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा संदेश दिला. कार्यक्रम आटोपून भरणे यांचा ताफा शासकीय विश्रामगृहाकडे जाताना एका तरूणाने त्यांच्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Dattatray Bharne In Beed)
नितीन मुजमुले असे या तरुणाचे नाव असून बीड नगरपालिका अंतर्गत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकारी नीता अंधारे यांना बडतर्फ करा अशी मागणी या तरूणाने केली आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे प्रशासनाचा गोंधळ उडाला. मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पाडून दत्तात्रय भरणे शासकीय विश्रामगृहाकडे निघाले होते. त्यांचा ताफा डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पर्यंत पोहोचताच या तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने अचानक गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. (Beed Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Hindu Garjana Chasak 2025 | हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा लोगोचे युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते अनावरण;
दि. 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान रंगणार आखाडा (Video)
Pune Metro News | पुणेकरांसाठी गुड न्यूज! ‘या’ मेट्रो मार्गास केंद्र सरकारचा हिरवा कंदील,
वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न