Beed Crime News | पतीचा हार्ट अटॅकने मृत्यू, विरह सहन न झाल्याने पत्नीने उचलले टोकाचे पाऊल, दोघांनाही एकाच चितेवर दिला अग्नी
बीड: Beed Crime News | पतीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना पत्नीला समजताच विरह सहन न झाल्याने पत्नीनेही टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले आहे. त्यानंतर दोघांचेही एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. बीडमधील खामकरवाडी गावात ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खामकरवाडी या गावातील रहिवासी असलेले शिक्षक कन्हैयालाल पांडुरंग खामकर (वय -४८) हे शिरूर शहरामध्ये वास्तवास होते. कन्हैयालाल यांचे बायपासचे ऑपरेशन झालेले होते. गेल्या काही दिवसांपासून खामकरवाडी येथे ते कुटुंबासहित राहत होते. गुरुवारी पहाटे त्यांच्या प्रकृतीमध्ये अचानक बिघाड झाल्याने त्यांना शिरूर शहरातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले होते. यावेळी उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आपल्या पतीच्या मृत्यूची बातमी पत्नी राहीताई कन्हैयालाल खामकर (वय- ४२) यांच्या कानावर पडताच त्यांना मोठा धक्का बसला. पत्नी राहीताई खामकर यांनी कोणालाही न समजू देता विषारी द्रव प्राशन केला. सकाळी सहा वाजता त्यांना त्रास सुरू झाल्यानंतर उपचारासाठी दवाखान्यात नेले.
यावेळी राहीताई खामकर उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या लोकांना मलाही पतीच्या चितेवरच अग्नी द्या,
असे सांगत होत्या. दरम्यान उचारासाठी जात असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
खामकरवाडी स्मशानभूमीत पती कन्हैयालाल खामकर आणि पत्नी राहीताई खामकर यांना एकाच चितेवर
अग्नी देण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांना गहिवरून आले होते. अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा