Beed Crime News | संतोष देशमुख प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची हत्या, घरात आढळला मृतदेह, अंजली दमानियांचे खळबळजनक आरोप, पोलिसांनी आरोप फेटाळले

Beed Crime

बीड : Beed Crime News | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणात ज्या महिलेच्या घरी त्यांना नेण्यात येणार होते, त्याच महिलेचा आता मृत्यू झाला आहे. या महिलेचा मृतदेह घरात पडून असल्याने दुर्गंधी सुटली होती. त्यानंतर घराचे दार तोडून मृतदेह बाहेर काढला गेला. मात्र आता संबंधित महिलेचा मृत्यू कसा झाला? तिची हत्या झाली का? हत्येमागे कोण? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत त्या महिलेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, आता पोलिसांनी या महिलेच्या मृत्यूबाबत एक वेगळीच माहिती दिली आहे. त्या महिलेचा सापडलेला मृतदेहाबाबत पोलिसांनी स्पष्टीकरण दिले असून दमानिया यांनी केलेले आरोप पोलिसांनी फेटाळले आहेत.

अंजली दमानिया यांनी नेमकं काय म्हंटलं होतं ?

गूढ संपता संपत नाही आणि हत्या संपता संपत नाहीत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची कळंब शहरात हत्या? संतोष देशमुखांवर अनैतिक आरोप करण्यासाठी तयार असलेली कळंब शहरातील द्वारकानगर मध्ये राहत असलेल्या महिलेची हत्या झाल्याचं कळतंय. या महिलेची ७ ते ८ दिवसांपुर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत.

अजून याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतिक संबंधातून हत्या झाली? अशी चर्चा सध्या सुरू आहे, असा दावा अंजली दमानिया यांनी केला होता.

दरम्यान अजनली दमानिया यांनी केलेले हे आरोप पोलिसांनी फेटाळले आहेत. कळंब शहरातील द्वारकानगरीत मृत अवस्थेत सापडलेल्या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. कळंब येथील महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर सुरू असलेली चर्चा पोलिसांनी फेटाळली आहे. अंजली दमानिया यांच्या आरोपानंतरही पोलिसांनी काहीही संबंध नसल्याची माहिती दिली आहे. पोलीस विभागाकडे याबाबत कुठलीही माहिती नाही अंजली दमानिया यांना चुकीची माहिती असेल, त्यावर आम्ही काय बोलणार असे पोलिसांनी त्यांचे मत मांडले आहे.

You may have missed