Belgaum Crime News | ‘तुम्हाला अटक होऊ शकते..’; सायबर चोरट्यांकडून छळ अन् निवृत्त अधिकाऱ्याची पत्नीसह आत्महत्या

Suicide

बेळगाव : Belgaum Crime News | सायबर चोरट्यांकडून झालेल्या छळाला कंटाळून बेळगाव जिल्ह्यातील खानापुरा येथे एका निवृत्त अधिकाऱ्याने आपल्या पत्नीसह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सायबर फसवणूक करण्यासाठी मयताच्या फोटो आयडीचा वापर करण्यात आला. त्यामुळे ‘तुम्हाला अटक होऊ शकते,’ अशी धमकी आरोपींनी व्हिडिओ कॉलवर दिली होती. अटकेच्या भीतीने दाम्पत्याने आत्महत्या (Suicide) केल्याचे बोलले जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, डिएगो नजरत (वय 83) आणि पाविया नजरत (वय 79) असे आत्महत्या करणाऱ्या वृद्ध दाम्पत्याची नावे आहेत. डिएगो हे महाराष्ट्रात रेल्वे विभागात अधिकारी होते. मागील काही महिन्यांपासून सायबर गुन्हेगार या वृद्ध जोडप्याला फोन करून धमकावत होते. पोलीस अधिकारी असल्याचे भासवून त्यांनी फोटो आयडीचा वापर करून काही लोकांची फसवणूक केल्याची धमकी दिली होती. धमक्यांना घाबरून या जोडप्याने विविध प्रसंगी फसवणूक करणाऱ्यांच्या खात्यात 5 लाख रुपये हस्तांतर केले होते. फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना अधिक पैसे देण्यासाठी छळ सुरू केला होता. या छळाला कंटाळून या जोडप्याने अखेर त्यांच्या घरातच जीवन संपवले आहे.

दरम्यान, पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुलेडा (Superintendent Of Police Bhimashankar Guleda) म्हणाले की, जोडप्याच्या घरी एक सुसाईड नोटदेखील सापडली आहे. जोडप्यांना त्यांच्या फोटो आयडीचा वापर करून कोणीतरी सायबर फसवणूक केल्याचा फोन आला होता. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.

You may have missed