Bengaluru Mahalaxmi Murder Case | फ्लॅटमध्ये महिलेच्या मृतदेहाचे 30 तुकडे; बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा, “पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच…”

Bengaluru Mahalaxmi Murder Case

बंगळुरू : Bengaluru Mahalaxmi Murder Case | श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाप्रमाणेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. एका फ्लॅटमध्ये महिलेच्या मृतदेहाचे ३० तुकडे सापडले आहेत. मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते. हत्या झालेल्या महिलेचे नाव महालक्ष्मी असे आहे. महालक्ष्मी मागील नऊ महिन्यांपासून पतीपासून वेगळी राहात होती. आता याप्रकरणी मृत महिलेचा पती हेमंत दास याने मोठा खुलासा केला आहे.

https://www.instagram.com/p/DASnH29ir7Q/?img_index=1

अशरफ नावाच्या तरुणासोबत पत्नी रिलेशनशिपमध्ये होती आणि त्याने तिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले असे म्हंटले आहे. माध्यमांशी बोलताना हेमंत दासने सांगितले, एक महिन्यापूर्वी मुलीला भेटायला आला असता त्याची पत्नीशी भेट झाली होती.

https://www.instagram.com/p/DASlTO9pp1N

हेमंतने सांगितले , महालक्ष्मी काही महिन्यांपासून अशरफसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि ती त्याच्यासोबत फ्लॅटमध्ये राहत होती. अशरफ हा उत्तराखंडचा रहिवासी आहे. तो बंगळुरूमध्ये एका दुकानात काम करत होता.

https://www.instagram.com/p/DASjYGBJs3_

हेमंत दासने पुढे सांगितले की, महालक्ष्मी सोबत त्याचं लग्न केवळ सहा महिने टिकले. त्यानंतर दोघेही वेगळे राहू लागले. यानंतर महालक्ष्मीने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि बंगळुरूला येणं बंद केले. हेमंत दासने दावा केला की, त्याची पत्नी आणि अशरफ यांचे संबंध होते. अशरफनेच खून केल्याचा संशय हेमंतने व्यक्त केला.

https://www.instagram.com/p/DASgQ7AC-OH/?img_index=1

फ्लॅटमध्ये महालक्ष्मीचा मृतदेह ३० तुकड्यांमध्ये आढळून आला. फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने महालक्ष्मीचा मृत्यू झाल्याचे समोर आले तेव्हा सर्वजण हादरले. पोलीस जेव्हा फ्लॅटवर पोहोचले तेव्हा त्यांना तेथे एक बॅगही आढळली. महालक्ष्मीच्या मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्याचा आरोपीचा डाव असल्याचा पोलिसांना संशय आहे.

https://www.instagram.com/p/DASejKNJE53

महालक्ष्मी हत्येप्रकरणी बंगळुरूचे पोलीस आयुक्त दयानंद म्हणाले, पोलीस अधिक तपास करत आहेत.
आरोपीची ओळख पटली असून त्याच्या अटकेचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पोलिसांनी आरोपीबाबत माहिती देण्यास नकार दिला.
आरोपी हा बाहेरचा असून त्याच्याबाबत आपण जास्त माहिती देऊ शकत नाही,
असे त्यांनी सांगितले. (Bengaluru Mahalaxmi Murder Case)

https://www.instagram.com/p/DAScxq0ptls

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Water Supply | पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! गुरुवारी कात्रज आणि इतर परिसरातील पाणी पुरवठा राहणार बंद

Maharashtra Assembly Election 2024 | जागावाटपावरून संघर्ष पेटला! शिवसेना ठाकरे गटाकडून बंडखोरीचा इशारा

Sharad Pawar On NDA Modi Govt | ‘लोकसभेला मोदी 400 पार सांगत होते,
दिल्लीत त्यांचे सरकार आले नसते पण…’, शरद पवारांचे वक्तव्य; म्हणाले – “सत्तेचा गैरवापर…”

You may have missed