Bhagyashri Atram On Dharmarao Baba Atram | शरद पवार गटात प्रवेश करताच भाग्यश्री आत्राम यांचा वडिलांवर हल्लाबोल; म्हणाल्या – “आपले मंत्रीसाहेब….”

गडचिरोली: Bhagyashri Atram On Dharmarao Baba Atram | विधानसभेच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Assembly Election 2024) राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी राज्यात दौरे सुरू करत आढावा घेण्यास सुरूवात केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटात इन्कमिंग वाढले आहे.
अजित पवार गटाला (Ajit Pawar NCP) एकामागून एक धक्का मिळत आहे. आज मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. विधानसभेच्या दृष्टीने हा प्रवेश महत्वाचा आहे.
शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर भाग्यश्री आत्राम यांनी स्वतःच्या वडिलांवरच हल्लाबोल केला आहे. भाग्यश्री आत्राम म्हणाल्या, ” मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात अनेक प्रश्न रेंगाळले आहेत. रस्त्यांची समस्या असताना कार्यकर्त्यांची गर्दी होणे, हे आपल्यावरील प्रेम दिसतं. आदिवासी नागरिक, महिलांचे प्रश्न दुर्लक्षित करण्यात आलेत.
आपले मंत्रीसाहेब येतात आणि जातात, समस्यांकडे दुर्लक्ष करतात, असं म्हणत भाग्यश्री यांनी धर्मरावबाबा आत्राम यांना लक्ष्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत त्या अहेरी विधानसभा मतदारसंघातून स्वतःच्या वडिलांविरोधात निवडणूक लढू शकतात, असे संकेत त्यांनी दिले आहेत.
त्या पुढे म्हणाल्या , ” मी घर फोडून जात नाहीये, धर्मरावबाबा हे नक्षलांच्या तावडीत होते. तेव्हा शरद पवार यांनी मध्यस्थी केली. मी त्यांच्या उपकाराची परतफेड केली आहे. बाबावरील फिल्ममधे त्यांनी कबूल केले आहे.” त्या म्हणाल्या, “अजितदादा यांनी म्हटले, चूक झाली. तुम्हीही शरद पवार गटात या, चूक सुधारा. मी शरद पवार यांचे ऋण विसरू शकत नाही.”
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा