Bhakta Pundlikas Temple Alandi | मुसळधार पावसाने आळंदीतील भक्त पुंडलिकाचे मंदिर पाण्याखाली; इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

Bhakta Pundlikas Temple Alandi

आळंदी : Bhakta Pundlikas Temple Alandi | मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. घाटमाथ्यावर पाऊस कोसळत असल्याने धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.तर काही ठिकाणी धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. दरम्यान पावसामुळे इंद्रायणी नदीपात्रात पाण्याची वाढ होऊन पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असून श्री संत भक्त पुंडलिकाचे मंदिर पाण्याखाली गेले आहे.

नदीपात्रालगत पोलीस बंदोबस्त नसल्याने येथील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागावा या उद्देशाने श्री क्षेत्र आळंदी भागाकडे जाण्यासाठी एका पुलासह इतरत्र दोन पुल बांधण्यात आले असून येथील चाकण चौकातील नव्या पुला नजीक असलेला बंधारा हा पूर्णपणे पाण्याखाली गेला असून मंदिराकडे जाण्यासाठी पादचारी नागरिकांसाठी बांधण्यात आलेला पादचारी पुल देखील पाण्याखाली गेला आहे. याचबरोबर नदीकिनारी असलेले श्री संत भक्त पुंडलिकाचे मंदिर देखील पाण्यात बुडाले असून मंदिराच्या कळसाचे भाविकांना दर्शन घेण्याची वेळ येत आहे.

नदीपात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नदीने धोक्याची पातळी ओलांडली असताना देखील या ठिकाणी आळंदी व दिघी पोलीस स्टेशनच्या वतीने नदीपात्रातील घाटावर कोणत्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात पोलीस यंत्रणा असमर्थ ठरल्याने या भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Khadakwasla Dam | खडकवासला धरण 100 टक्के भरले ! मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात; नागरिकांना खबरदारीचे आवाहन

Kothrud Hit & Run Case | कोथरूडमध्ये हिट अँड रन; खाजगी बसने दुचाकीस्वारासह इतर वाहनांना उडवले (Video)

Sindhudurg Crime News | पोलीस दलात अधिकारी असल्याचे भासवत नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक

Lonavala Rains | लोणावळ्यात विक्रमी पावसाची नोंद ! गेल्या 24 तासांत तब्बल 275 मिलीमीटर पावसाची नोंद