Bharati Vidyapeeth New Law College | भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज मध्ये संविधान दिन साजरा

Bharati Vidyapeeth New Law College

पुणे: Bharati Vidyapeeth New Law College | भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज (एरंडवणे , पुणे) येथे ‘भारतीय संविधान दिन- २०२४’ (Constitution Day) उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने चार विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमध्ये सामूहिक शपथ समारंभ, आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजूषा स्पर्धा, महाविद्यालयीन पातळीवरील वक्तृत्व स्पर्धा, ‘अँटी डीफेक्शन लॉ ’ या विषयावर स्पर्धा आणि ‘भारतातील संघराज्य व्यवस्थेतील बदलते पैलू’ या विषयावर डॉ. मनोजकुमार शर्मा (पतियाळा) यांचे ऑनलाईन कायदेविषयक चर्चासत्र यांचा समावेश होता. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन डॉ. उज्वला बेंडाळे (अधिष्ठाता आणि प्रभारी प्राचार्या, न्यू लॉ कॉलेज) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

‘अँटी डीफेक्शन लॉ ’ या विषयावर घेण्यात आलेल्या महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत भूमिका जैन प्रथम क्रमांकावर विजेती ठरली, तर रुही आणि अभ्युदय सिंग अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय उपविजेते ठरले.आंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजूषा स्पर्धेत रिया माथुर आणि देबारुण मुखर्जी यांनी विजय मिळवत भारतीय संविधानाविषयी असलेल्या ज्ञानाची चमक दाखवली.या कार्यक्रमांचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये घटनात्मक मूल्यांची जाणीव निर्माण करणे आणि समकालीन कायदेशीर विषयांवर चर्चा घडवून आणणे हा होता.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Who Will Next CM Of Maharashtra | महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी मराठाच चेहरा हवा?,
दिल्लीत खलबतं; शिंदेंचीच वर्णी लागणार? राजकीय हालचाली वाढल्या

Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्‍वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी