Bharatiya Mazdoor Sangh | भारतीय मजदूर संघ 70 व्या वर्षात असंघीटत , कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणार; वर्धापन दिनाच्या निमित्ताने घोषणा
पुणे : Bharatiya Mazdoor Sangh | 23 जुलै भारतीय मजदूर संघा चा 69 वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने लेडी रमाबाई सभागृह एस पी काॅलेज येथे झालेल्या कामगार मेळावा मध्ये अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाचे सेक्रेटरी तुकाराम डिंबळे यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना केले आहे. याच दिवशी 1955 साली, लो. टिळक जयंतीच्या मुहूर्तावर भोपाळ मधे भा. म. सं. ची स्थापना झाली. आज भारतीय मजदूर संघ ला , 6000 संलग्न संघटना सह 3 कोटी पेक्षा जास्त सभासद संख्या असलेली जगातील एकमेव कामगार संघटना झाली आहे. पण अद्याप पर्यंत विविध ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे महत्वपूर्ण प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत, तसेच असंघीटत क्षेत्रातील कामगारांच्या न्याय हक्कांच्या मागण्या करिता संर्घष करणार आहे असे मनोगत व्यक्त केले आहे.
च्या स्थापने पासून त्याची आजपर्यंत झालेली वाटचाल याचा आढावा घेतला. त्यांनी आपल्या भाषणात आपल्या कामगार संघटना (भा म सं सोडून ) आपल्या कामगारांचे हित करण्याचे ध्येय च विसरल्या आहेत हे सांगताना 2 उदाहरणं दिली. ती म्हणजे वर्तमान पत्रात आलेल्या 2 बातम्या. पहिली म्हणजे इटली मधे एका रोबोट ने कामाचा ताण सहन न होऊन केलेली आत्महत्या व दुसरी म्हणजे एका राज्याने आपल्या येथील काही कंपन्या मधे कामाच्या वेळा (तास ) वाढविण्याचा प्रस्ताव.
तसेंच त्यांनी भा म सं ज्या त्रिसूत्री वर आधारित आहे त्या म्हणजे, “राष्ट्राचे औद्योगिकीरण उद्योगांचे श्रमिकीकरण व श्रमिकांचे राष्ट्रीयीकरण या त्रिसुत्रीनेच वाटचाल केली पाहिजे. असे मनोगत व्यक्त केले आहे.
सरकारने असंघीटत क्षेत्रातील कामगारांच्या करिता भरीव तरतूद केली नाही, त्यामुळे कामगारांच्या कल्याणकारी योजना फक्त कागदावर राहण्याची शक्यता आहे.
कंत्राटी कामगार कायदा ही कामगारांना न्याय देण्यासाठी नसुन कामगारांचे शोषणच या माध्यमातून होत आहे. कायम स्वरूपाचे काम, रिक्त पदांवर कार्यरत कंत्राटी कामगारांना कायम नोकरीत समाविष्ट करावे अशी ही मागणी कामगार मेळावा मध्ये केली आहे.
प्रास्ताविक करताना महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात यांनी वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे बाबतीत अनेक वर्षापासून सातत्याने आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे. मा उर्जा मंत्री यांनी जाहीर घोषणा केली आहे पण प्रशासनाने अद्याप पर्यंत अंमलबजावणी केली नाही.
या वेळी अर्जुन चव्हाण, भारतीय मजदूर संघ पुणे ज़िल्हा अध्यक्ष अभय वर्तक, हरी सोवनी होते.
या वेळी भारतीय मजदूर संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष एम पी सिंग, केंद्रीय ऊद्योग प्रभारी अण्णा धुमाळ,
भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश चे माजी अध्यक्ष श्री बाळासाहेब फडणवीस,
बीडी महासंघाचे कार्याध्यक्ष उमेश विस्वाद यांची विषेश उपस्थित होते.
अर्जुनराव चव्हाण यांचे भा. म सं. चे महत्व सांगणारे समयोचित भाषण झाले.
अभय वर्तक यांनी आभार मानले. त्या नंतर सौं. स्वाती देशपांडे यांचे संपूर्ण वंदे मातरम होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
विवेक ठकार यांनी सूत्र संचालन केले. व निलेश खरात यांनी प्रास्तविक केले.
या प्रसंगी औद्योगिक, बीडी, वीज, बॅंक, संरक्षण, टेलिफोन, एल आय सी, वीज व विविध ऊद्योगातील कंत्राटी कामगार,
सुरक्षा रक्षक, बीडी कामगार, मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख सागर पवार यांनी दिली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sindhudurg Crime News | पोलीस दलात अधिकारी असल्याचे भासवत नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक
Lonavala Rains | लोणावळ्यात विक्रमी पावसाची नोंद ! गेल्या 24 तासांत तब्बल 275 मिलीमीटर पावसाची नोंद