Bharti Vidyapeeth Police News | पुणे : स्वामी नारायण मंदिराकडे जाणार्‍या रोडवर कमरेला पिस्तुल लावून थांबलेल्या सराईत गुन्हेगाराला पकडून गावठी पिस्तुल हस्तगत

Bharti Vidyapeeth Police

पुणे : Bharti Vidyapeeth Police News | स्वामी नारायण मंदिराकडे जाणार्‍या रोडवर कमरेला पिस्तुल लावून सराईत गुन्हेगार उभा असल्याच्या माहितीवरुन भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडून पिस्तुल व काडतुस जप्त केली आहे. (Pune Crime News)

https://www.instagram.com/p/DAaOXAvigL6

अभय ऊर्फ अजय अशोक निसर्गंध Abhay Alias Ajay Ashok Nisargandh (वय २४, रा. सिद्धिविनायक कॉलनी, जांभुळवाडी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. (Pistol Seized)

https://www.instagram.com/p/DAaK9xAi7Qm

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना सहायक फौजदार नामदेव रेणुसे व सतिश मोरे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील (Criminal On Police Record) आरोपी अभय निसर्गंध हा भूमकर चौकाकडून (Bhumkar Chowk Pune) स्वामी नारायण मंदिराकडे जाणार्‍या रोडवर कमरेला पिस्तुल लावून उभा आहे. या माहितीची खात्री करुन त्याचा शोध पोलीस घेऊ लागले. अप्पाज हॉटेलच्या पाठीमागील बाजुस अभय निसर्गंध हा थांबल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५० हजार रुपयांचे गावठी पिस्टल व १ हजार रुपयांचे एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी त्याला अटक केली.

https://www.instagram.com/p/DAYgNWPpIQK

ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil), सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी (ACP Nandini Vagyani) , वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील (Sr PI Dashrath Patil), निरीक्षक (गुन्हे) शरद झिने (PI Sharad Zine) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम (API Sameer Kadam), समीर शेंडे (API Sameer Shande), पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी (PSI Nilesh Mokashi), सहायक फौजदार नामदेव रेणुसे, शैलेंद्र साठे, पोलीस अंमलदार चेतन गोरे, हनुमंत मासाळ, महेश बारावकर, निलेश ढमढेरे, निलेश जमदाडे, मंगेश पवार, सतीश मोरे, अवधुत जमदाउे, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचीन गाडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांनी केली आहे.

https://www.instagram.com/p/DAYNeVRicWp

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Viman Nagar Pune Crime News | प्रवासादरम्यान माझ्याजवळ झोप असे म्हणत बसचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्‍यास पोलिसांनी केली अटक

Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’

You may have missed