Bhartiya Samvidhan Vichar Sammelan | कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रमातून संविधानाचा जागर

Bhartiya Samvidhan Vichar Sammelan

विश्वभुषण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने संविधान दिना निमित्त ‘भारतीय संविधान विचार संमेलन’

पुणे : Bhartiya Samvidhan Vichar Sammelan | भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विश्वभुषण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने संविधान दिना निमित्त आयोजित ‘भारतीय संविधान विचार संमेलन’ मध्ये कविसंमेलन आणि ‘भारतीय संविधान का संगीतमय सकर’ या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बहारदार सादरीकरणातून संविधानाचा जागर करण्यात आला. 

बालगंधर्व रंगमंदिर येथे संविधान दिनानिमित्त संमेलनाचे मुख्य आयोजक परशुराम वाडेकर (Parshuram Wadekar) आणि निमंत्रक सुनीता वाडेकर (Sunita Wadekar) यांच्या वतीने आयोजित या संमेलनाचा विषय ‘भारतीय संविधानाचे ७५ वर्षे .. विकास व वाटचाल’ हा होता.

संविधानाच्या भोवती गुंफन्यात आलेल्या या कविसंमेलनाच्या  अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवी   प्रकाश घोडके होते तर संमेलनात अंजली कुलकर्णी,  देवा झिंजाड,  जित्या जाली आदि मान्यवर कवी सहभागी झाले होते, त्यांनी स्वातंत्र्य, न्याय, समता आणि बंधुता  या विषयांवरील तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षावरील आपल्या कवितांचे सादरीकरण करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. कविसंमेलनाचे सुत्रसंचालन सुमित गुणवंत यांनी केले. 

 ‘भारतीय संविधान का संगीतमय सकर’ या सांस्कृतिक कार्यक्रमातून  हून अधिक कलाकारांनी गायन, नृत्य सादरीकरणातून संविधानाच्या ७५ वर्षांची वाटचाल उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती सुनिल महाजन, नृत्य  दिग्दर्शन  निकिता मोघे, संहिता लेखन  सक्ष्‌मीकांत देशमुख, कार्यक्रमाचे संयोजन  दिपक म्हस्के, केतकी महाजन-बोरकर यांनी केले होते तर  गायक  संदीप उबाळे, सौरभ दफ्तरदार, रश्मी मोघे यांनी आपल्या बहारदार गायनाने पुणेकरांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sahakar Nagar Pune Crime News | पुणे : अनैसर्गिक कृत्य करायला लावून धमकाविल्याने दहावीतील मुलाची आत्महत्या

Eknath Shinde To Shivsainik | मुख्यमंत्रीपदावरून साशंकता, एकनाथ शिंदेंचे शिवसैनिकांना भावनिक
आवाहन; म्हणाले – ‘माझ्यावरील प्रेमापोटी…’

Ulhas Dhole Patil | माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांचे निधन

Pune Rural Police News | स्मशानभूमीमधील लाकडावरुन पोलिसांनी उघडकीस आणला खुनाचा गुन्हा ! वालचदंनगर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

Sahakar Nagar Pune Accident News | पीएमपी बसच्या धडकेत रस्ता ओलांडणार्‍या महिलेचा मृत्यु; पुणे सातारा रोडवरील सहकारनगर येथील घटना

You may have missed