Bhau Rangari Ganpati | पुणे: श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी (Videos)

पुणे : Bhau Rangari Ganpati | सालाबादप्रमाणे यंदाही हिंदुस्थानातील पहिल्या सार्वजनिक गणपतीचे, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे. सनई व चौघड्यांची सुरावट, शंख नाद आणि ढोल ताशांचा जल्लोषपूर्ण निनाद अशा उत्साही व मंगलमय वातावरणात गणेशभक्त गणेशोत्सवात सहभागी होत आहेत. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’ गजरात पुण्याचे वातावरण भक्तिमय झाल्याचे पाहायला मिळत आहे. ((Shrimant Bhausaheb Rangari Ganpati)
https://www.instagram.com/p/C_0mV3tpb7E
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे बाप्पांच्या दर्शनासाठी सामाजिक, राजकीय, प्रशासकीय, मनोरंजन, क्षेत्रातील मान्यवरांनी याठिकाणी भेट देत बाप्पाचे दर्शन घेऊन आरती केली. उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीतदादा बालन यांच्याकडून मान्यवरांचा सन्मान करण्यात येत आहे. शहरातील गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध सार्वजनिक उत्सव म्हणून ओळखला जातो. दरम्यान याठिकाणी गणेशोत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतो आहे.
https://www.instagram.com/p/C_0ni1bJ6f1
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे उत्साह आणि नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे.
आपल्यावर सदैव बाप्पाची कृपादृष्टी राहावी म्हणून गणरायाच्या चरणी भाविक प्रार्थना करीत आहेत.
प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर यांच्या हस्ते यंदा बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.
https://www.instagram.com/p/C_2XL22pG8D
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा