Bhavani Peth Pune Crime News | भवानी पेठेत गुंडांचा हैदोस, वाहनांची तोडफोड; दोघा सराईत गुंडांना अटक
पुणे : Bhavani Peth Pune Crime News | भवानी पेठेतील भारत टॉकीज (Bharat Cinema Bhavani Peth Pune) परिसरात ८ ते १० जणांच्या गुंडाच्या टोळक्याने लोखंडी रॉड, बांबु, कोयते हवेत फिरवत दहशत पसरविली. वाहनांची तोडफोड केली. समर्थ पोलिसांनी (Samarth Police Station) दोघा सराईत गुंडांना अटक केली आहे. (Bhavani Peth Pune Crime News)
सईद अमजद पठाण Syed Amjad Pathan (वय २०, रा. पत्र्याची चाळ, भवानी पेठ), दानिश आसिफ शेख Danish Asif Shaikh
(वय १९, रा. हरमेन कॉम्प्लेक्स, भवानी पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघांवर खूनाचा प्रयत्न (Attempt To Muder), गर्दी मारामारी, जमावबंदीचा आदेश मोडणे, दहशत पसरविणे असे यापूर्वी गुन्हे दाखल आहेत.
याबाबत मोहसीन तवकल कांबळे (वय ३७, रा. वीरभारत सोसायटी, जुना मोटार स्टँड, भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना भारत टॉकीज शेजारील एम के सोडा दुकानासमोर शनिवारी रात्री अकरा वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा भाचा कैस रहेमान सुन्नेवाले हे दुकानात होते. त्यावेळी ८ ते १० गुंड हातात लाकडी बांबु, स्टीलचे रॉड, कोयते घेऊन गल्ली आले. त्यांनी भारत टॉकील जवळील पार्किगमध्ये पार्क केलेल्या मोटासायकलचे पुढील हेडलाईटचे कव्हर, फिर्यादीचा भाऊ वसीम कांबळे यांचा आयशर टॅकचा समोरील काचेवर लाकडी बांबु, दगड, स्टीलचा रॉड मारुन फोडला.
फिर्यादी यांनी आरोपींना याचा जाब विचारला असता त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन त्यांच्या अंगावर धावून गेले. त्यांच्यापैकी एकाने स्टीलचा रॉड हातात घेऊन शिवीगाळ करत जादा बोला तो तुझे छोडुंगा नही, हम यहा के भाई है, तु जादा बोला तो तुझे खतम कर दुंगा असे बोलून अंगावर धावून गेला. त्यांच्यातील भांडणाच्या आवाजामुळे लोक जमा झाल्याने हे सर्व गुंड हातातील स्टील रॉड, लाकडी बांबु हवेत फिरवून शिवीगाळ करीत, यहा अपना कोई कुछ उखाड नही सकता, जो बीचे मे आयेगा, उसको खतम कर देंगे असे बोलून दहशत निर्माण करुन ते निघुन गेले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे (DCP Nikhil Pingle), पोलीस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), संदिपसिंग गिल (Sandeep Singh Gill), सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे (ACP Ganesh Ingle), वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळगावकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य