Bhavani Peth Pune Crime News | दुकानासमोर उभे राहिल्याने चाकूने केला पोटात वार ! भवानी पेठेतील घटना, दुकानदाराला अटक

Stabbing Case

पुणे : Bhavani Peth Pune Crime News | दुकानासमोर गप्पा मारत उभे राहू नको, असे सांगितल्यावरही न ऐकल्याने दुकानदाराने तरुणाच्या पोटात चाकूने वार करुन जबर जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Stabbing Case)

याबाबत अंकुश राम मगर (वय ३८, रा. चुडामण तालीम चौक, भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी फरहाज अक्रम कुरेशी (वय २८, रा. चुडामण तालीम चौक, भवानी पेठ) याला अटक केली आहे. ही घटना भवानी पेठेतील दिनशी अपार्टमेंट येथे गुरुवारी दुपारी पावणेचार वाजता घडली. (Bhavani Peth Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र अनिल हे दोघे दिनशी अपार्टमेंट समोर गप्पा मारत उभे होते. तेथेच फरहाज कुरेशी याचे लब्बाईक चिकन सेंटर आहे. हे उभे असताना कुरेशी याने “इथे माझ्या दुकानाशेजारी थांबून बडबड करुन नका, दुसरीकडे जावा,” असे सांगितले. त्यावर फिर्यादी यांनी “तुझ्या दुकानाचे समोर उभा नाही राहिलो,” असे बोलले. त्यावर त्याने शिवीगाळ करत “इथे कशाला येऊन बसतो,” असे म्हणून त्याने चिकन सेंटर दुकानामधील चाकू घेऊन बाहेर आला. रागाने फिर्यादी यांच्या पोटालगत चाकूने वार केला.

चाकू लागल्यामुळे रक्तस्त्राव होऊ लागल्याने फिर्यादी आरडाओरडा करु लागले.
त्यांचा आरडाओरडा ऐकून त्यांची आई व तेथील रहिवासी आले.
त्यांनी फिर्यादी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांनी गुन्हा दाखल करुन फरहाज कुरेशी याला अटक केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे (PSI Akash Vite) तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed